---Advertisement---

लाजीरवाणे! चालू सामन्यात मुख्य प्रशिक्षकाने मारला सिगारेटचा दम, सोशल मीडियावर फोटो तुफान व्हायरल

On: रविवार, फेब्रुवारी 12, 2023 5:18 PM
Khaled-Mahmud
---Advertisement---

शुक्रवारी (दि. 10 फेब्रुवारी) ढाका येथे बांगलादेश प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेतील 42वा सामना खेळण्यात आला. या सामन्यात खुलना टायगर्स संघाने 6 विकेट्सने शानदार विजय साकारला. मात्र, सामन्यादरम्यान एक हैराण करणारे दृश्य पाहायला मिळाले. स्पर्धेतील अखेरच्या साखळी सामन्यात खुलना संघाचे मुख्य प्रशिक्षक खालिद महमूद हे ड्रेसिंग रूममध्ये बसून सिगारेट ओढताना दिसले. त्यांचा हा फोटो कॅमेऱ्यात कैद झाला आणि आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

खालिद महमूद (Khaled Mahmud) हे बांगलादेशचे माजी क्रिकेटपटू आहेत. सध्या त्यांच्या खांद्यावर खुलना टायगर्स (Khulna Tigers) संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी आहे. खुलना टायगर्स संघ बांगलादेश प्रीमिअर लीग 2023 (Bangladesh Premier League 2023) स्पर्धेच्या प्लेऑफ शर्यतीतून आधीच बाहेर पडला आहे. अशात साखळी फेरीच्या अखेरच्या सामन्यात त्यांनी स्पर्धेला निरोप देणारा सामना खेळला. यामध्ये त्यांच्या पदरात यशही पडले. त्यांनी या सामन्यात विजय मिळवला.

मुख्य प्रशिक्षक सिगारेट ओढताना
साखळी फेरीचा अखेरचा सामना फॉर्च्यून बारिशाल विरुद्ध खुलना टायगर्स (Fortune Barishal vs Khulna Tigers) संघात पार पडला. या सामन्यात बारिशाल संघाने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी प्रथम फलंदाजी करताना त्यांनी निर्धारित 20 षटकात 8 विकेट्स गमावत 169 धावा चोपल्या. हे आव्हान खुलना संघाने 19.3 षटकात 4 विकेट्स गमावत 172 धावा ठोकत पूर्ण केले. तसेच, सामना 6 विकेट्सने नावावर केला. खुलना संघाला अखेरच्या षटकात विजयासाठी 9 धावांची आवश्यकता होती. पहिल्या चेंडूवर 1 धाव केली. यानंतर हबीबुल रहमान याने आधी चौकार आणि नंतर तिसऱ्या चेंडूवर षटकार खेचत खुलना संघाला विजय मिळवून दिला.

सामना तर संपला, परंतु खालिद महमदू यांचा सिगारेट ओढतानाचा फोटो (Khaled Mahmud Cigarette Photo) अजूनही चर्चेत आहे. अनेक युजर्स हा फोटो शेअर करत म्हणत आहेत की, ही खूपच लज्जास्पद बाब आहे. अनेकांनी यावर मीम्सही बनवले आहेत.

टीव्ही शोमध्येही सिगारेट ओढताना दिसलेत खालिद
खालिद यांनी सार्वजनिक ठिकाणी सिगारेट ओढतानाची ही पहिलीच वेळ नाहीये. काही वर्षांपूर्वी ते एका लाईव्ह शोमध्ये ब्रेकदरम्यान सिगारेट ओढताना दिसले होते. बांगलादेश प्रीमिअर लीगमध्येही असे पूर्वी घडले आहे. मागील वर्षी बीपीएलमध्ये खेळताना अफगाणिस्तानचा यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद शहजाद सामन्यापूर्वी मैदानात सिगारेट ओढताना दिसला होता. त्यानंतर त्याच्यावर दंडही ठोठावण्यात आला होता. (khulna tigers head coach khaled mahmud cigarette dressing room bangladesh premier league photo viral)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अभिमानास्पद! ‘ही’ महिला बनली टी20 विश्वचषकात मैदानावर पंचगिरी करणारी पहिलीच भारतीय; जाणून घ्याच
भारतीयांनो सावधान! दिल्ली काबीज करण्यासाठी ऑस्ट्रेलियाने मायदेशातून बोलावला मर्फीसारखाच आणखी एक स्पिनर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---