रविवारी (१९ डिसेंबर) विश्व बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम फेरी पार पडली. पुरूष एकेरीच्या अंतिम सामन्यात भारताचा किदांबी श्रीकांत आणि सिंगापूरच्या लोह किन येव हे दोन्ही दिग्गज खेळाडू आमने सामने होते. परंतु, या सामन्यात भारताच्या हाती निराशाच लागली आहे. अंतिम सामन्यात पराभूत झाल्याने श्रीकांतला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. असे असले तरी त्याने मोठा इतिहास घडवला आहे.
किदांबी श्रीकांतला (Kidambi Srikanth) लोह किन येवने २१-१५, २२-२० ने पराभूत केले. दोन्ही खेळाडूंमध्ये ४३ मिनिटं चुरशीची लढत पाहायला मिळाली. हा किदांबी श्रीकांतचा लोह किन येव विरुद्ध पहिलाच पराभव होता. यापूर्वी हे दोघेही खेळाडू २०१८ मध्ये झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये आमने सामने आले होते. त्या सामन्यात किदांबी श्रीकांतने २१-१७ , २१- १४ ने पराभूत केले होते.
किदांबी श्रीकांत हा विश्व बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत रौप्य पदक जिंकणारा पहिला भारतीय पुरुष खेळाडू आहे. तसेच, या स्पर्धेत पदक जिंकणारा तो चौथा भारतीय पुरुष खेळाडू ठरला आहे. १९८३ मध्ये प्रकाश पदुकोणचे कांस्यपदक हे जागतिक स्पर्धेत भारताचे पहिले पदक होते. यानंतर, २०१९ मध्ये बी साई प्रणीत आणि यावेळी लक्ष्य सेनने कांस्यपदक जिंकले.
We are proud of you @srikidambi ♥️🔥😍
Congratulations on 🥈medal! 👏👏#BWFWorldChampionships2021#Badminton pic.twitter.com/Tx8Hex8bjc
— BAI Media (@BAI_Media) December 19, 2021
दुसऱ्या सेटमध्ये श्रीकांतचा पराभव
दुसऱ्या सेटमध्ये सलग चार गुण घेत लोह कीन यूनने २०-१९ अशी आघाडी घेतली. यानंतर किदांबी श्रीकांतने दोन मॅच पॉइंट वाचवले आणि सामना २०-२० असा बरोबरीत आणला. पण त्यानंतर किदांबी श्रीकांतला लय राखता आली नाही आणि त्याला सामना गमवावा लागला.
तसेच चांगली सुरुवात करूनही किदांबी श्रीकांतला पहिला सेट गमवावा लागला. सिंगापूरच्या खेळाडूने पहिला गेम अवघ्या १६ मिनिटात २१-१५ असा आपल्या नावावर केला होता.
महत्वाच्या बातम्या :
वेगवान गोलंदाजीत हातखंडा असलेला इंग्लिश बॉलर अचानक करू लागला ऑफ स्पिन; पाहून आयसीसीही थक्क
‘या’ ३ दिग्गज क्रिकेटपटूंनी निवृत्तीची केली खूपच घाई, अजूनही करू शकले असते दमदार प्रदर्शन