---Advertisement---

पोलार्डच्या ‘कॅप्टन्सी इनिंग’ने वेस्ट इंडिजचा दक्षिण आफ्रिकावर २१ धावांनी विजय, मालिकेतही साधली बरोबरी

On: शुक्रवार, जुलै 2, 2021 9:45 AM
Kieron-Pollard
---Advertisement---

वेस्ट इंडिज विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात चालू असलेली ५ सामन्यांची टी२० मालिका अतिशय रोमांचक स्थितीत आहे. गुरुवार रोजी (०१ जुलै) सेंट जॉर्ज, ग्रेनेडा स्टेडियम येथे उभय संघात चौथा टी२० सामना पार पडला. या चुरशीच्या सामन्यात यजमान वेस्ट इंडिजने २१ धावांनी बाजी मारत मालिकेत २-२ अशी बरोबरी साधली आहे. या मालिकेतील पाचवा आणि अंतिम सामना शनिवारी होईल.

नाणेफेक जिंकून पाहुण्या दक्षिण आफ्रिकाने वेस्ट इंडिजला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले होते. वेस्ट इंडिजने निर्धारित २० षटकात ६ गडी गमावत १६७ धावा केल्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचा संघ २० षटकअखेर ९ गड्यांच्या मोबदल्यात केवळ १४९ धावाच करू शकला. परिणामी वेस्ट इंडिजने २१ धावांनी सामना खिशात घातला.

ड्वेन ब्रावोच्या भेदक माऱ्यापुढे दक्षिण आफ्रिकाचे लोटांगण
वेस्ट इंडिजच्या १६८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकाचा यष्टीरक्षक फलंदाज क्विंटन डॉ कॉकने धुव्वादार फलंदाजी केली. ४३ चेंडूंचा सामना करताना २ षटकार आणि ६ चौकारांच्या मदतीने त्याने ६० धावा चोपल्या. परंतु डी कॉक वगळता दक्षिण आफ्रिकेचा एकही फलंदाज साध्या २० धावांचा आकडाही पार करू शकला नाहीत.

वेस्ट इंडिजचा अष्टपैलू ड्वेन ब्रावो आणि आंद्रे रसेल (२ विकेट्स) यांच्या भेदक माऱ्यापुढे त्यांनी नांग्या टाकल्या. त्यामुळे केवळ १४६ धावांवर त्यांचा डाव संपुष्टात आला. याच सामन्यात ब्रावोने त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट गोलंदाजी कामगिरीचीही नोंद केली आहे. त्याने ४ षटके गोलंदाजी करताना अवघ्या १९ धावा देत ४ विकेट्स घेतल्या आहेत.

कर्णधार कायरन पोलार्डची ताबडतोब फलंदाजी
तत्पुर्वी पहिल्या डावात वेस्ट इंडिजकडून २ फलंदाजांनी मोठी खेळी केली. कायरन पोलार्डने कॅप्टन्सी इनिंग खेळत डावाखेर नाबाद अर्धशतक झळकावले. अवघ्या २५ चेंडूंमध्ये ५ षटकार आणि २ चौकारांचा वर्षाव करत त्याने ५१ धावा जोडल्या. सलामीवीर लिंडल सिमन्सनेही ४७ धावांचे योगदान दिले. यामुळे वेस्ट इंडिजला २० षटकांत १६७ धावांचा पल्ला गाठता आला. दरम्यान दक्षिण आफ्रिकाचे गोलंदाज जॉर्ज लिंडे आणि तबरेज शम्सी प्रत्येकी २ फलंदाजांना बाद करु शकले.

महत्त्वाच्या बातम्या-

मॅच फिक्सिंगच्या आपोरात दोषी आढळले ‘हे’ २ क्रिकेटपटू, आयसीसीने ८ वर्षांसाठी केले बॅन

दुखापतीची आडकाठी; विश्वविजेता कर्णधार विलियम्सनची ‘या’ मोठ्या लीगमधून माघार

माजी क्रिकेटरचा छातीठोक दावा; म्हणाले, ‘शास्त्रीनंतर द्रविडच असणार टीम इंडियाचा नवा प्रशिक्षक’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---