श्रीलंका संघ सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर असून दोन्ही संघात ३ सामन्यांची वनडे मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना वेस्ट इंडिजने ८ विकेट्सने जिंकत मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. अँटिग्वा येथे झालेल्या या सामन्यापेक्षा कायरन पोलार्ड याचे गैरवर्तन आणि श्रीलंकन फलंदाज दनुष्का गुणातिलका बाबत पंचांच्या विवादात्मक निर्णयाची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. अनेकांनी क्षेत्ररक्षणात बाधा आणल्याने पोलार्डला आरोपीच्या पिंजऱ्यात अडकवले आहे. याबाबतीत आता दनुष्काने मोठा खुलासा केला आहे.
वनडे सामना संपल्यानंतर स्वत: पोलार्डने गुणातिलकाची क्षमा मागितली असल्याचे त्याने सांगितले आहे. एका श्रीलंकान न्यूज चॅनेलशी बोलताना गुणातिलका म्हणाला की, “पोलार्डने त्याच्या चुकीसाठी क्षमा मागितली होती. त्याने मला म्हटले की, त्याला त्यावेळी चेंडू व्यवस्थित दिसला नव्हता. व्हिडिओ पाहिल्यानंतर त्याला समजले होते की, त्याने मुद्दाम चेंडू अडवला नव्हता. तरीही त्याने माझी क्षमा मागितली.”
नक्की काय आहे प्रकरण?
श्रीलंकन संघाचा फलंदाज दनुष्का गुणातिलका आक्रमक फलंदाजी करत असताना वेस्ट इंडिज संघाचा कर्णधार कायरन पोलार्ड २२ वे षटक टाकण्यासाठी आला होता. पोलार्डने डाव्या हाताचा फलंदाज गुणातिलका याला सरळ चेंडू टाकला. त्या चेंडूवर गुणातिलकाने रक्षात्मक शॉट खेळत एक धाव घेण्याचा प्रयत्न केला.
तो चेंडू पकडण्यासाठी पोलार्ड धावला आणि तो चेंडू गुणातिलकाच्या पायाला लागला. त्यामुळे पोलार्डला तो चेंडू पकडता आला नाही. नंतर पंचांकडे वेस्ट इंडिज संघाने अपील केले. त्यावेळी पंचांनी ऑब्स्ट्रकटिंग द फील्डच्या (क्षेत्ररक्षणात बाधा आणल्यामुळे) नियमानुसार त्याला बाद घोषित केले.
Danushka Gunathilaka has been given out Obstructing the field. Very difficult to interpret if this was a wilful obstruction. Looks unintentional but has been given out as per the lawspic.twitter.com/CJh3GmzvaN
— Sarang Bhalerao (@bhaleraosarang) March 10, 2021
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या निर्णयावर गुणातिलका आणि क्रिकेट चाहत्यांनी निराशा व्यक्त केली आहे. व्हिडिओमध्ये पाहिल्यास स्पष्ट दिसून येत आहे की, त्याने मुद्दाम चेंडूला लाथ मारली नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
सूर्यकुमार यादवला बुमराह-संजनाच्या नात्याची पूर्वकल्पना होती? ‘ते’ ट्विट करत आहे इशारा
टी२० मालिका: पाहुण्यांना चारणार पराभवाची धूळ! ‘या’ भारतीय शिलेदारांवर असेल सर्वांची नजर