अबुधाबी। मंगळवारी (२८ सप्टेंबर) इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामातील ४२ व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने पंजाब किंग्स संघाचा ६ विकेट्सने पराभव केला. मुंबईच्या या विजयात अष्टपैलू कायरन पोलार्डचे महत्त्वाचे योगदान राहिले. त्याने या सामन्यात २ विकेट्स घेतल्या. तसेच नाबाद १५ धावा केल्या.
पोलार्डच्या ३०० टी२० विकेट्स
या सामन्यात प्रथम फलंदाजीसाठी मैदानात आलेल्या पंजाब किंग्सच्या ७ व्या षटकात पोलार्डने ख्रिस गेल (१) आणि केएल राहुल (२१) या दोघांना माघारी धाडले. याबरोबरच त्याने ३०० टी२० विकेट्स पूर्ण केल्या. गेलला त्याने षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर हार्दिक पंड्याकडे झेल देण्यास भाग पाडले. तर, याच षटकाच्या चौथ्या चेंडूवर त्याने केएल राहुलला बाद केले. राहुलचा झेल जसप्रीत बुमराहने शॉर्ट फाईन लेगला पकडला.
त्यामुळे राहुल हा पोलार्डची ३०० वी टी२० विकेट ठरला. पोलार्डनेही खास शैलीत या विकेटचे सेलिब्रेशन केले. त्याने हाताने हावभाव करत ही त्याची ३०० वी विकेट असल्याचे निदर्शनास आणून दिले. त्याच्या या सेलिब्रेशनचे फोटो आणि व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहेत.
पोलार्डचा विश्वविक्रम
पोलार्डच्या ३०० टी२० विकेट्स पूर्ण झाल्याने त्याच्या नावावर एक विक्रमही झाला आहे. टी२० क्रिकेट प्रकारात १० हजारांहून अधिक धावा करणारा आणि ३०० किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेणारा तो एकमेव क्रिकेटपटू ठरला आहे. यापूर्वी कोणत्याही खेळाडूला असा कारनामा करता आलेला नव्हता.
तब्बल १७ संघांकडून पोलार्डने आत्तापर्यंत ५६५ टी२० सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने १ शतक आणि ५६ अर्धशतकांसह ११२०० पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. तो टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा ख्रिस गेलनंतरचा (१४२७५) दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज आहे.
M42: MI vs PBKS – KL Rahul Wicket https://t.co/7PMEJXeGYS
— Swadesh Ghanekar (@swadeshLokmat) September 28, 2021
https://twitter.com/Itz_don_/status/1442863528038207498
Brilliant Performance From Saurabh, Hardik, Pollard and Bumrah
Pollard completed 300 T20 wickets
Tiwari once again performed under pressure and played a crucial Knock
And Bumrah Looking in FormLooks Like We are finally getting on track👐🏻 pic.twitter.com/7i2JBjSe2O
— Harshad 🇮🇳 (@HBJ3221) September 28, 2021
व्हिडिओ पाहाण्यासाठी येथे क्लिक करा
मुंबईचा विजय
मुंबईने मंगळवारी ६ विकेट्सने विजय मिळवला. हा त्यांच्या युएईमध्ये आयपीएल २०२१ चा पहिलाच विजय ठरला. १३६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईकडून सौरभ तिवारीने सर्वाधिक ४५ धावांची खेळी केली. तर हार्दिक पंड्याने ३० चेंडूत नाबाद ४० धावा केल्या. तसेच क्विंटन डी कॉकने २७ धावांची छोटेखानी खेळी केली. तसेच पोलार्डने ७ चेंडूत नाबाद १५ धावा केल्या. त्यामुळे मुंबईने १९ षटकात ४ बाद १३७ धावा करत विजय मिळवला. पंजाबकडून रवी बिश्नोईने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या.
तत्पूर्वी, पंजाबकडून एडेन मार्करमने सर्वाधिक ४२ धावांची खेळी केली. मार्करमने दीपक हुडासह ६१ धावांची भागीदारी केली. हुडाने २८ धावा केल्या. तसेच केएल राहुलने २१ धावा केल्या. याव्यतिरिक्त कोणालाही २० धावांचा टप्पा ओलांडता आला नाही. त्यामुळे पंजाबला २० षटकांत ६ बाद १३५ धावाच करता आल्या होत्या. मुंबईकडून जसप्रीत बुमराह आणि कायरन पोलार्डने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. तसेच कृणाल पंड्या आणि राहुल चाहरने प्रत्येकी १ विकेट घेतली.
महत्त्वाच्या बातम्या –
सेहवागला पछाडत पंतच्या दिल्लीसाठी सर्वाधिक धावा; तर इतर संघांसाठी ‘हे’ खेळाडू आहेत ‘रनमशीन’