आयपीएल २०२१ च्या ५५ व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने सनरायझर्स हैदराबादला विजयासाठी २३६ धावांचे लक्ष्य ठेवले होते. मुंबईसाठी सूर्यकुमार यादव (८२) आणि इशान किशन (८४) यांनी हैदराबादच्या गोलंदाजांना झंझावाती अर्धशतकी खेळी केली होती. पण निर्धारित २० षटकात हैदराबादचा संघ १९३ धावाच करू शकला आणि मुंबईने ४२ धावांनी विजय साकारला.
या सामन्यात, मुंबईच्या चाहत्यांना टी २० फलंदाज कायरन पोलार्डकडून मोठ्या आशा होत्या. पण तो विशेष काही करू शकला नाही. मात्र, ज्या प्रकारे तो बाद झाला. त्यामुळे सर्वांना महेंद्रसिंग धोनीची आठवण झाली.
पोलार्डला बाद करण्यासाठी, गोलंदाज अभिषेक शर्मा आणि हैदराबादचा कर्णधार मनीष पांडेने धोनीसारखी शक्कल लढवली आणि त्यांनी केलेली योजना एकदम बरोबर ठरली. मनीष पांडेने, अभिषेकच्या पहिल्याच षटकात, पोलार्डविरुद्ध खेळपट्टीच्या अगदी समोर क्षेत्ररक्षकाला उभे केले होते.
पोलार्ड नेहमी सरळ शॉट खेळून षटकार आणि चौकार मारतो, हे अनेकदा पाहिले गेले आहे, पण यावेळी तो मनीष पांडे आणि अभिषेक शर्मा यांच्या युक्तीचा बळी ठरला. जेसन रॉयने सीमारेषेवर एक शानदार झेल घेतला आणि पोलार्डचा डाव संपवला. याआधीही धोनीने अशाच प्रकारे क्षेत्ररक्षण लावून पोलार्डला बाद केले आहे. त्यामुळे पोलार्ड हैदराबादविरुद्ध बाद झाल्यानंतर धोनीची आठवण क्रिकेट चाहत्यांना झाली.
व्हिडिओ पाहाण्यासाठी येथे क्लिक करा
मुंबईने हैदराबाद विरुद्ध सामना जिंकला पण प्लेऑफसाठी पात्र ठरू शकले नाही. नेट रनरेटच्या आधारे कोलकाता नाईट रायडर्सने प्लेऑफमध्ये आपले स्थान पक्के केले आहे. तसेच साखळी फेरीनंतर गुणतालिकेत दिल्ली कॅपिटल्स पहिल्या स्थानावर आहे. चेन्नई सुपर किंग्स दुसऱ्या स्थानी तर विराट कोहलीचा रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ तिसऱ्या स्थानी आहे. त्यामुळे, या तिन्ही संघांनी आधीच आपले स्थान पक्के केले होते. मात्र चौथ्या स्थानासाठी उत्सुकता होती. यात कोलकाता नाईट रायडर्सने बाजी मारली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
बिश्नोईने क्लीन बोल्ड करताच धोनीचा चढला पारा, रागात उच्चारला अपशब्द? व्हिडिओ व्हायरल
टी२० विश्वचषक तोंडावर असताना पाकिस्तान संघात ३ मोठे बदल, एक खेळाडूही दुखापतीमुळे संघाबाहेर