मुंबई इंडियन्सचा अष्टपैलू कायरन पोलार्ड याचा नेहमी पंचांशी ३६चा आकडा राहिला आहे. बऱ्याचदा मैदानात याचा प्रत्यय आला आहे. सोमवारी (०९ मे) कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध झालेल्या सामन्यातही असेच काहीसे पाहायला मिळाले. या सामन्यादरम्यान पोलार्डने मैदानी पंचांना चेंडू मारला. मात्र त्याने मुद्दाम ही कृती केली नसून हा एक अपघात होता.
ही मजेशीर घटना मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियमवर झालेल्या आयपीएल २०२२च्या ५६व्या सामन्यातील (MI vs KKR) दहाव्या षटकात घडली. टाइमआऊटनंतर मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) पोलार्डला (Kieron Pollard) गोलंदाजीसाठी बोलावले. पहिल्या चेंडूवर चौकार खाल्ल्यानंतर पोलार्डने पुढील ३ चेंडूंवर १-१ धाव दिली.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
त्यानंतर तो डाव्या हाताने कोलकाताचा फलंदाज नितीश राणा याला षटकातील पाचवा चेंडू टाकण्यासाठी गेला आणि अचानक चेंडू त्याच्या हातातून निसटला. हा चेंडू निसटून यष्टीजवळ उभा असलेल्या पंचांच्या पोटाला जाऊन (Pollard Hit Ball To Umpire) लागला. सुदैवाने पंचांना काही दुखापत झाली नाही. हा प्रसंगानंतर खुद्द पंच आणि गोलंदाज पोलार्ड या दोघांनाही हसू फुटले.
कर्णधार रोहित शर्माही त्याचे हसू आवरू शकला नाही आणि तो पंचांची विचारपूस करण्यासाठी त्यांच्याकडे गेला. पोलार्डनेही आपल्या हातून घडलेल्या अपघातानंतर पंचांची क्षमा मागितली. हा प्रसंग कॅमेरात कैद झाला असून याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
https://twitter.com/patidarfan/status/1523677920098947072?s=20&t=s-ktCcpt20ILVGw4UEepYg
Kieron Pollard takes out umpire Chris Gaffaney! 😅
#MIvKKR | #KKRvsMI | #IPL2022 pic.twitter.com/Y1XAzz0J3f
— 🏏Flashscore Cricket Commentators (@FlashCric) May 9, 2022
दरम्यान सामन्याबाबत बोलायचे झाल्यास, मुंबई संघाला त्यांच्या खराब फलंदाजी प्रदर्शनामुळे पराभवाला सामोरे जावे लागले. प्रथम फलंदाजी करताना कोलकाता संघ निर्धारित २० षटकात ९ विकेट्सच्या नुकसानावर १६५ धावा करू शकला. कोलकाताकडून सलामीवीर वेंकटेश अय्यर आणि नितीश राणा यांनी प्रत्येकी ४३ धावांची खेळी केली. इतर फलंदाज मात्र मुंबईचे गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि कुमार कार्तिकेय यांच्यापुढे जास्त वेळ टिकू शकले नाहीत. कार्तिकेयने २ तर बुमराहने ५ विकेट्स घेतल्या.
कोलकाताच्या आव्हानाचा पाठलाग करताना मात्र मुंबईच्या फलंदाजांचा घाम निघाला. सलामीवीर इशान किशनला वगळता मुंबईचा एकही फलंदाज साध्या २० धावाही करू शकला नाही. इशानने सर्वाधिक ५१ धावांचे योगदान दिले. कोलकाताचे गोलंदाज पॅट कमिन्स आणि आंद्रे रसेल यांनी मुंबईला १७.३ षटकातच ११३ धावांवर गुंडाळले आणि ५२ धावांनी सामना जिंकला.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
केकेआरचा कर्णधार आणि कोचमध्ये नाही सर्वकाही अलबेल, माजी क्रिकेटरच्या प्रतिक्रियेने खळबळ
मुंबई इंडियन्सच्या पराभवाचे खलनायक ठरले ‘हे’ ३ क्रिकेटर्स, रोहितच्या भरवशाच्या खेळाडूचाही समावेश
राजस्ठानचा धाकड फलंदाज हेटमायर बनला ‘बाप’माणूस, गोंडस व्हिडिओ शेअर करत दिली माहिती