आयपीएल २०२१ मध्ये शनिवारी (१ मे) चेन्नई सुपर किंग्स (सीएसके) विरुद्ध मुंबई इंडियन्स असा सामना खेळला गेला. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात मुंबईने २१९ धावांचे विशाल लक्ष पार करून सामना आपल्या नावे केला. तुफानी अर्धशतक ठोकणारा मुंबईचा अष्टपैलू कायरन पोलार्ड सामन्याचा मानकरी ठरला. या सामन्यात त्याने आयपीएल २०२१ मधील सर्वात वेगवान अर्धशतक पूर्ण केले.
पोलार्डची पॉवर
चांगल्या सुरुवातीनंतर झटपट गडी बाद झाल्यावर संघाचा सर्वात वरिष्ठ खेळाडू कायरन पोलार्ड पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरला. त्याने सुरुवातीपासूनच चेन्नईच्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले. त्याने ३४ चेंडूत ६ चौकार व ८ उत्तुंग षटकारांच्या मदतीने नाबाद ८७ धावांची अफलातून खेळी केली. यादरम्यान त्याने अवघ्या १७ चेंडूत अर्धशतक झळकावून आयपीएल २०२१ मधील सर्वात वेगवान अर्धशतक ठोकले.
या खेळाडूंनी ठोकली आहेत हंगामात वेगवान अर्धशतके
आयपीएल २०२१ मधील सर्वात वेगवान अर्धशतकाचा विक्रम पोलार्डच्या नावे झाला. या यादीत दुसर्या क्रमांकावर दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर पृथ्वी शॉ असून त्याने केकेआर विरुद्ध १८ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले होते. याच सामन्यात चेन्नईकडून अर्धशतक ठोकणारा अंबाती रायुडू तिसर्या स्थानी असून त्याने २० चेंडूत ५० धावा पूर्ण केलेल्या. पंजाब किंग्सच्या दिपक हुडाने देखील २० चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावले होते. केकेआरचा प्रमुख अष्टपैलू आंद्रे रसेल याने चेन्नई विरुद्ध २१ चेंडूंमध्ये अर्धशतकी खेळी केली होती.
आयपीएल २०२१ मधील वेगवान अर्धशतके
कायरन पोलार्ड- १७ चेंडू विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स
पृथ्वी शॉ- १८ चेंडू विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स
अंबाती रायुडू- २० चेंडू विरूद्ध मुंबई इंडियन्स
दिपक हुडा- २० चेंडू विरुद्ध राजस्थान रॉयल्स
आंद्रे रसेल- २१ चेंडू विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स
महत्त्वाच्या बातम्या –
रायुडूची भर मैदानात तोडफोड, नक्की झाल काय? पाहा व्हिडिओ
मुंबईविरुद्ध अर्धशतक करताच फाफ डू प्लेसिस ‘असा’ कारनामा करणारा बनला चेन्नईचा पहिलाच फलंदाज
चेन्नईकडून खेळताना अंबाती रायडूची कमाल! धोनीच्या या मोठ्या विक्रमाची केली बरोबरी