वेस्ट इंडीजचा माजी कर्णधार आणि स्टार अष्टपैलू खेळाडू कायरन पोलार्ड आगामी टी20 विश्वचषकासाठी इंग्लंड क्रिकेट संघासोबत जोडला आहे. पोलार्ड टी20 विश्वचषकात इंग्लंडच्या सहाय्यक प्रशिक्षकेच्या भूमिकेत दिसणार आहे. 37 वर्षीय पोलार्ड इंग्लंड संघामध्ये ट्रेनिंग सेशन दरम्यान बार्बाडोस येथे पहायला मिळाला. गतविजेता इंग्लंड संघाने स्थानिक खेळाडू पोलार्डला संघासोबत जोडून अनेक संघांना धक्का दिला आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डने सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये पोलार्ड इंग्लंडच्या सराव जर्सी मध्ये पहायला मिळत आहे.
First session: ✅
❤️ @KieronPollard55 pic.twitter.com/cfTW0xg5X0
— England Cricket (@englandcricket) June 2, 2024
मागील डिसेंबर महिन्यात मैथ्यू माॅटचे कार्यकाळ संपल्याने आता इंग्लंडने कायरन पोलार्डला मर्यादित षटकांच्या सामन्यात संघाचे बँटीग कोच म्हणून नियुक्त केले आहे. पोलार्डच्या येण्याने इंग्लंडच्या कोचिंग स्टाफमध्ये आणखीन भर पडली आहे. इंग्लंडचे लक्ष्य सध्या अमेरिका आणि वेस्ट इंडीज येथे आता सुरु असलेल्या टी20 विश्वचषकावर आहे. आणि वेस्ट इंडीजच्या राहणाऱ्या पोलार्ड शिवाय तेथील मैदानांना कोण बरे एवढे चांगले ओळखणार आहे.
आपल्या शानदार क्रिकेट करिअर सोबत पोलार्डकडे खूप सारे अनुभव आहे. त्याने 101 टी20 सामन्यात वेस्ट इंडीजचे नेतृत्तव केले आहे. तसेच 2012 मध्ये वेस्ट इंडीजला विश्वचषक जिंकवण्यात पोलार्डने महत्वाची भूमिका बजावली होती. परंतू 2022 मध्ये पोलार्डने अंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती घेतली होती. त्यासोबतच पोलार्ड जगभरातील अनेक टी20 फ्रेंचाइजी लीगमध्ये सहभागी आहे. ज्यामध्ये तो वेग-वेगळी भूमिका बाजावतो.
पोलार्ड आयपीएल मध्ये त्याने 189 सामने खेळला आहे. ज्यामध्ये 3412 धावा काढल्या आहेत. तर गोलंदाजीत त्याने 69 विकेट्स घेतल्या आहेत. 2023 पासून तो मुंबई इंडीयन्ससाठी बँटीग कोचची भूमिका सांभाळत आहे. पाकिस्तान सुपर लीगच्या नवव्या हंगामात कराची किंग्जचे प्रतिनिधित्व केले होते.
महत्तवाच्या बातम्या-
नामिबियाच्या रुबेन ट्रम्पेलमननं रचला इतिहास! टी20 विश्वचषकात अशी कामगिरी करणारा जगातील पहिलाच गोलंदाज
टी20 विश्वचषकात 12 वर्षांनंतर सुपर ओव्हरचा थरार! नामिबियाचा ओमानवर रोमहर्षक विजय
चेंडू चुकून लागल्यानंतर गोलंदाजानं बाद केलं नाही, अशी खिलाडूवृत्ती क्रिकेटमध्येच दिसते! पाहा VIDEO