हार्दिक पंड्या आणि कृणाल पंड्या दोघेही मागील काही वर्षांपासून आयपीएल मधील मुंबई इंडियन्स संघाकडून खेळत आहेत. कायरन पोलार्ड हा या संघाचा उपकर्णधार असून तो संघाचा सध्याचा सर्वात जुना खेळाडू आहे. पंड्या बंधूबद्दल बोलताना त्याने दोघांपैकी कोण ‘स्मार्ट’ पंड्या आहे, हे सांगितले आहे.
कोण आहे समजदार पंड्या ?
मुंबई इंडियन्सने ट्विट केलेल्या व्हिडीओमध्ये कायरन पोलार्डने कृणाल पंड्याला ‘स्मार्टर’ (हुशार) असे म्हटले आहे. या व्हिडिओमध्ये आत्मविश्वासाने खेळून स्वतःला सिद्ध करण्याचा बाबतीत हार्दिक आणि मी समान वृत्तीचे असल्याचं पोलार्ड म्हणतो. आमचे विचार जुळत असून आम्ही दोघेही सारखाच खेळ करतो असेही पोलार्ड म्हणाला. पंड्या ब्रदर्ससोबत माझे खूप चांगले नाते आहे ते मैदानाबाहेर जितके आहे तितकेच मैदानात देखील आम्ही ठेवतो असे पोलार्ड म्हणाला.
What's Polly's equation with the #PandyaBrothers?
Hear it from him 😋#OneFamily #MumbaiIndians #MI #Dream11IPL @KieronPollard55 @hardikpandya7 @krunalpandya24 pic.twitter.com/WMqrEYJ44D
— Mumbai Indians (@mipaltan) November 8, 2020
मुंबई इंडियन्सचा संघ मंगळवारी (11 नोव्हेंबर) दिल्ली केपीटल्स विरोधात आयपीएल 2020 चा अंतिम सामना खेळणार आहे. या सामन्यात हार्दिक पंड्या, कृणाल पंड्या व कायरन पोलार्ड हे अष्टपैलू खेळाडू देखील खेळताना दिसणार आहेत. उपकर्णधार कायरन पोलार्डने या हंगामात 259 धावा व 4 बळी घेतले आहेत. कृणाल पंड्याने 108 धावा व 6 बळी घेतले आहेत. तर हार्दिक पंड्याने 278 धावा केल्या आहेत. या तिघांनीही महत्वपूर्ण खेळ आतापर्यंत केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
योगायोग आलाय जुळून! दिल्ली जिंकणार आयपीएलचे पहिले विजेतेपद?
एकेकाळी रस्त्यावर ट्रॅफिक कंट्रोल करणारा बनला टीम इंडियाचा थ्रो-डाउन विशेषज्ञ
पर्पल कॅप पटकावणाऱ्या रबाडाच्या खात्यात मोठ्या विक्रमाची नोंद, भल्या भल्यांवर ठरला वरचढ