इंडियन प्रीमियर लीग ही जगातील सर्व टी२० लीगमधील सर्वाधिक प्रसिद्ध लीग आहे. हेही खरे आहे की, आयपीएलमध्ये खेळणाऱ्या क्रिकेटपटूंना मोठी रक्कम मिळते. त्यामुळे प्रत्येक खेळाडूची इच्छा असते की त्याला आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळावी.
पण, एक असा क्रिकेटपटू आहे ज्याने आयपीएलमध्ये खेळण्यासाठी चक्क आपल्या देशाचा संघच सोडण्याचा विचार केला होता. असे करणारा क्रिकेटपटू अजून कोण नाही तर तो आहे वेस्ट इंडिजचा धुरंधर फलंदाज कायरन पोलार्ड. तो टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा जगातील दुसरा फलंदाज आहे. म्हणून त्याला ‘सिक्सर किंग’ या नावानेही ओळखले जाते.
पोलार्डने संघ सोडण्याचा विचार करण्याची करामत २०११मध्ये केली होती. त्यावेळी वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाने आपल्या संघातील क्रिकेटपटूंना टी२० लीगमधून मिळणाऱ्या पैशातून आपल्या वाट्याचे पैसे घेण्यासाठी त्यांना एका करारात बांधायचे ठरवले होते. परंतु, हट्टी स्वभावाच्या पोलार्डने त्यावेळी थेट आपल्या देशाचा क्रिकेट करार फेटाळला होता. Kieron Pollard rejected his country cricket board contract for ipl.
याच पोलार्डचा आज (१२ मे) ३५ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने एक नजर टाकूयात पोलार्डच्या क्रिकेट कारकिर्दीतील काही विशेष गोष्टींवर…
‘सिक्सर किंग’ पोलार्डने २०१० मध्ये मुंबई इंडियन्स संघातून आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. यावेळी मुंबई इंडियन्सने त्याला ७.५ लाख डॉलर म्हणजे ३.३ कोटींना विकत घेतले होते. हा त्यावेळी आयपीएलच्या इतिहासात संयुक्त रुपाने करण्यात आलेला सर्वात महागडा करार होता.
पोलार्डच्या चॅम्पियन्स टी२० लीगमधील न्यू साउथ वेल्स संघाविरुद्धच्या फलंदाजी प्रदर्शनाने त्याला मुंबई इंडियन्सने इतक्या महाग किंमतीला विकत घेतले होते. त्याने त्रिनिदाद आणि टोबॅगो संघाकडून खेळताना १८ चेंडूत ५४ धावा केल्या होत्या. तेव्हापासून तो मुंबई इंडियन्स संघाचा महत्त्वाचा फलंदाज आहे. पोलार्डने आयपीएलमध्ये आतापर्यंत १८९ सामने खेळत ३४१२ धावा केल्या आहेत.
तसेच, पोलार्डच्या नावावर जगातील सर्वाधिक टी२० सामने खेळण्याचा एक अनोखा विश्वविक्रम आहे. आपल्या पूर्ण क्रिकेट कारकिर्दीत ३० संघांकडून अधिकृत क्रिकेट खेळलेल्या पोलार्डने आतापर्यंत ५९२ टी२० सामने खेळले आहेत. यासह ५०० किंवा त्यापेक्षा जास्त टी२० सामने खेळणारा तो जगातील एकमेव फलंदाज ठरला. त्याने २००६ पासून ते २०२२ पर्यंत टी२०त ७७३ षटकार मारत ११५७१ धावा केल्या आहेत.
शिवाय संघसहकारी ख्रिस गेलनंतर टी२० १०००० धावा करणारा आणि ५०० पेक्षा जास्त षटकार मारणारा पोलार्ड हा जगातील दुसरा फलंदाज आहे. या दोघांव्यतिरिक्त टी२० क्रिकेटमध्ये कोणत्याही फलंदाजाला इतक्या धावा आणि इतके षटकार करता आले नाहीत.
महत्त्वाच्या बातम्या –
Video: नागरकोटी बनला ‘सुपरमॅन’, डाईव्ह मारक पडकला पडीक्कलचा अवघड कॅच
रियान पराग निघाला राजस्थानचा ‘डॉन’, दिल्लीच्या घातक गोलंदाजाच्या भेदक चेंडूवर मारला ९६ मीटरचा षटकार
लॅपटॉप नाही, कागद-पेनाने बनवली रणनीती; कोच नेहराने नवख्या गुजरातला असे बनवले ‘चँपियन’