---Advertisement---

पोलार्डच्या नाराजीचे कारण समजले, मुंबई फ्रँचायझीमुळेच ठेवली ‘ती’ इंस्टाग्राम स्टोरी

On: रविवार, जानेवारी 7, 2024 10:24 PM
Kieron Pollard
---Advertisement---

वेस्ट इंडीजचा माजी दिग्गज अष्टपैलू कायरन पोलार्ड जगभरातील लीग क्रिकेट खेळत आहे. मुंबई इंडियन्स या आयपीएल फ्रँचायझीचेही जगभरातील लीगमध्ये संघ आहेत. आयपीएलमधून निवृत्त झालेला पोलार्ड मुंबई इंडियन्स संघाच्या सपोर्ट स्टाफचा भाग आहे. रविवारी (7 जानेवारी) पोलार्डने इंस्टाग्रामला एक कोट शेअर, ज्याची चांगलीच चर्चा झाली. अनेक अंदाज व्यक्त केल्यानंतर अखेर त्याने हे कोट शेअर करण्यामागचे कारण स्पष्ट झाले आहे.

रविवारी मुंबई इंडियन्सचा माजी खेळाडू कायरन पोलार्ड (Kieron Pollard) याने शेअर केलेल्या कोटची सर्वत्र चर्चा झाली. या स्टोरीनंतर मुंबई इंडियन्स आणि पोलार्डमध्ये काहीतरी बिनसल्याच्या चर्चा सुरू झाल्या. यानंतर पुढच्या काही तासांमध्येच एमआय एमिरेट्स संघाचे कर्णधारपद पोलार्डकडून काढून घेतल्याची बातमी समोर आली. यूएईच्या इंटरनॅशनल टी-20 लीगमध्ये मुंबई इंडियन्सकडून एमआय एमिरेट्स संघाचे नेतृत्व आगामी हंगामासाठी निकोलस पुरन (Nicholas Pooran) याच्याकडे सोपवण्यात आले आहे. “पाऊस थांबल्यानंतर आपण छत्रीला ओझे समजू लागतो. अगदी तसेच आपल्यापासून होणारा फायदा थंबल्यानंतर प्रामाणिकपणाही तिथेच संपतो,” या आशयाचे कोट पोलार्डने इंस्टाग्राम स्टोरीला शेअर केले होते.

एवढेच नाही, पोलार्डकडून दक्षिण आफ्रिकेच्या एसए20 लीगमधील कर्णधरपद देखील जाऊ शकत होते. पण एमआय कॅपटाऊन फ्रँचायझा कर्णधार म्हणून नियुक्त केलेला राशिद खान दुखापतीमुळे या लीगमध्ये खेळत नाहीये. अशात संघाचे कर्णधारपद पोलार्डकडे आहे. असे असले तरी पोलार्डसाठी चांगली गोष्ट हीच आहे की, एमआय न्ययॉर्क या संघाचे कर्णधारपद त्याच्याकडे कामय आहे. हा संघ एमएलसी टी-20 लीगचा भाग आहे.

दरम्यान, पोलार्डने आयपीएल 2022 नंतर पोलार्ड आयपीएलमधून निवृत्त झाला. मागच्या हंगामापासून तो मुंबई इंडियन्ससाठी फलंदाजी प्रशिक्षक म्हणून जबाबदारी सांभाळत आहे. दरम्यान, पोलार्डने रविवारी ठेवलेल्या स्टोरीनंतर अनेकांनी हार्दिक पंड्याचाही उल्लेख केला. आयपीएल 2024 साठी मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्या असणार आहे. रोहित शर्मा याला हटवून हार्दिकला संघाचा कर्णधार बनवल्यामुळे फ्रँचायझीवर चांगलीच टीका झाली होती. पोलार्ड देखील यामुळेच नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. पण पुढच्या काही तासांमध्येच चित्र स्पष्ट झाले.

(Kieron Pollard sacked as MI Emirates captain)

महत्वाच्या बातम्या – 
BREAKING! टी20 संघाचे सूत्र पुन्हा रोहितच्या हातात, अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा
‘या’ गोष्टी हार्दिकच्या विरोधात जातात, माजी सलामीवीराच्या मते टी-20 संघाचा कर्णधार रोहितचं राहणार

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---