---Advertisement---

कायरन पोलार्ड म्हणतो, या खेळाडूकडे आहे सर्वात स्मार्ट ब्रेन…

---Advertisement---

भारतीय संघाचा माजी कर्णधार एम एस धोनी काही काळ क्रिकेट मैदानापासून दूर राहिला असेल पण त्याचे चाहते  जगभरात आहे, ज्यामध्ये अनेक खेळाडू देखील आहे. वेस्ट इंडीजचा कर्णधार कायरन पोलार्डही त्यापैकी एक आहे, ज्याला धोनीची क्रिकेट क्षमता आवडते.

68 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळणार्‍या पोलार्डने एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की, धोनीकडे ‘स्मार्ट क्रिकेट ब्रेन’ आहे.

ईएसपीएन क्रिकइन्फोच्या व्हिडिओ क्लिपमध्ये जेव्हा पोलार्डला सर्वात जास्त ‘स्मार्ट क्रिकेट ब्रेन’ असणार्‍या क्रिकेटपटूचे नाव विचारले गेले तेव्हा त्याने धोनी आणि श्रीलंकेच्या माहेला जयवर्धने यांचे नाव सांगितले.

इंग्लंडमध्ये खेळलेल्या विश्वचषक 2019 च्या उपांत्य फेरीनंतर धोनी कोणताही क्रिकेट सामना खेळलेला नाही.

वेस्ट इंडीजनंतर तो भारताला दुसरा आवडता संघ मानतो अशी पोलार्डने प्रामाणिक प्रतिक्रिया दिली. तो असेही म्हटला आहे की त्यांच्या म्हणण्यानुसार केवळ ख्रिस गेल टी20 मधील पहिले द्विशतक ठोकू शकेल.

व्हिडिओ क्लिपमध्ये, कायरन  पोलार्डला विचारण्यात आले होते की, जेव्हा धाव घेत असताना गोलंदाजाच्या खांदा तुला लागला तर तु काय करणार,  मी त्याच्याकडे पाहणार नाही असे तो म्हणाला. तसेच तो म्हणाला की ड्वेन ब्राव्हो हा मुलांमध्ये विंडीजचा सर्वात प्रसिद्ध क्रिकेटपटू आहे.

तू पीएचडी केली तर त्याचा विषय काय असेल असे विचारले असता, पोलार्ड म्हणाला लोकांची मने वाचणे.

32 वर्षीय पोलार्ड सध्या भारता विरुद्ध टी20 आणि एकदिवसीय मालिकेत कर्णधारपद सांभाळत आहे. तथापि, 3 सामन्यांच्या टी20 मालिकेत त्याच्या कर्णधारपदी विंडीज संघाला 1-2 असा पराभव पत्करावा लागला.

आयपीएलमध्ये त्याने मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधित्व केले असून या संघाच्या विजयात अनेक वेळा त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.

https://twitter.com/Maha_Sports/status/1205491389485604864

https://twitter.com/Maha_Sports/status/1205478138811076608

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---