वेस्ट इंडिजचा माजी क्रिकेटपटू कायरन पोलार्ड अजूनही जगभरातील लीगमध्ये खेळताना दिसतो. मात्र, चाहत्यांना त्याच्या बॅटमधून पूर्वीसारखे उत्तुंग षटकार क्वचितच पाहायला मिळतात. पण पोलार्डने द हंड्रेड मालिकेत अफगाणिस्तानचा फिरकी जादूगार रशीद खानचा सामना केला. सदर्न ब्रेव्हकडून खेळणाऱ्या पोलार्डने राशिद खानला लागोपाठ 5 चेंडूत 5 षटकार ठोकले. रशीद ट्रेंट रॉकेटचा भाग आहे.
द हंड्रेडमध्ये षटक नसते. गोलंदाज सेटमध्ये गोलंदाजी करतात. ते सलग 5 चेंडू किंवा सलग 10 चेंडू टाकू शकतात. कायरन पोलार्डने सेटच्या सर्व 5 चेंडूंवर षटकार ठोकले. त्याने राशिद खानविरुद्ध 81 व्या चेंडूवर मिड-विकेटवर षटकार ठोकला. त्यानंतर पुढचा चेंडू लाँग ऑफ दिशेने बाऊंड्रीबाहेर पाठवला गेला. पोलार्डने पुढच्या दोन चेंडूंवर लाँग ऑफ आणि मिड-विकेटवर षटकार ठोकले. तर 85वा चेंडूवर पोलार्डने समोरच्या दिशेने षटकार खेचले.
Kieron Pollard hitting FIVE SIXES IN A ROW! 😱#TheHundred | #RoadToTheEliminator pic.twitter.com/WGIgPFRJAP
— The Hundred (@thehundred) August 10, 2024
या सामन्यात पोलार्डने आपल्या डावाची सुरुवात अतिशय संथ आणि सावध केली होती. त्याने पहिल्या 14 चेंडूत केवळ 6 धावा केल्या. सदर्न ब्रेव्हला शेवटच्या 20 चेंडूत विजयासाठी 49 धावांची गरज होती. संघाचे सहा फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतले होते. संघाच्या हातातून सामना निसटल्यासारखे वाटत होते. यानंतर पोलार्डने जगातील सर्वात धोकादायक स्पिनरवर हल्ला केला आणि 5 चेंडूत 30 धावा ठेकल्या. त्यानंतर 15 चेंडूत 19 धावा असे समीकरण राहिले. या सेटपूर्वी राशिदने 15 चेंडूत केवळ 10 धावा दिल्या होत्या.
सदर्न ब्रेव्हने अखेर हा सामना दोन गडी राखून जिंकला. पहिल्या डावात खेळताना ट्रेंट रॉकेट्स संघाने 8 विकेट्सवर 126 धावा केल्या. ज्यामध्ये ख्रिस जॉर्डनने तीन फलंदाजांना बाद केले. ब्रेव्ह संघाने एक चेंडू शिल्लक असताना लक्ष्य गाठले. पोलार्डने 23 चेंडूत 45 धावांची खेळी खेळली. पोलार्ड 91व्या चेंडूवर बाद झाला. यानंतर ख्रिस जॉर्डनने संघाला विजय मिळवून दिले.
हेही वाचा-
टीम इंडियातून बाहेर असलेल्या या खेळाडूचे पुनरागमन जवळपास अशक्यच, आता निवृत्ती हा एकमेव उपाय!
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला 6 नव्हे तर 12 पदके मिळाली असती; जाणून घ्या कशी झाली चूक
Paris Olympics: समारोप समारंभ कधी, कोठे किती वाजता; पाहा सगळं काही एका क्लिकवर