---Advertisement---

अविश्वसनीय! श्रीलंकन खेळाडूचा किरोन पोलार्डने घेतला लाजवाब झेल, पाहा व्हिडिओ

---Advertisement---

वेस्ट इंडिज विरुद्ध श्रीलंका यांच्यातील एकदिवसीय मालिकेला सुरुवात झाली आहे. यात वेस्ट इंडिज संघाकडून कायरोन पोलार्ड कर्णधाराची भूमिका पार पाडत आहे. पोलार्डने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अष्टपैलू खेळाडू सोबतच उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून देखील एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. तो हे मैदानावर सिद्ध देखील करत असतो.

नुकत्याच श्रीलंकेविरुद्ध झालेल्या पहिल्या वनडे सामन्यातही त्याने पुन्हा एकदा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक असल्याचे सिद्ध केले आहे. त्याने टिपलेल्या एका झेलचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

पोलार्डचा अविश्वसनीय झेल 

काही दिवसांपूर्वी कायरोन पोलार्डने युवराज सिंगच्या विक्रमाची बरोबरी करत, श्रीलंका विरुद्ध झालेल्या टी -२० आंतरराष्ट्रीय सामन्यात सलग सहा चेंडूत सहा षटकार लगावले होते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. त्यानंतर आता श्रीलंका विरुद्ध झालेल्या पहिल्या सामन्यात पोलार्डने श्रीलंकन संघाचा कर्णधार दिमुथ करुणारत्ने याचा अविश्वसनीय झेल टिपला आहे.

श्रीलंकन संघाचा कर्णधार दिमुथ करुणारत्ने फलंदाजी करत असताना २ वे षटक फेकण्यासाठी पोलार्ड गोलंदाजीला आला होता. त्याने ओवर द विकेटचा मारा करत चेंडू गूड लेंथच्या दिशेने टाकला. त्या चेंडूवर फलंदाजाने सरळ शॉट खेळला आणि पोलार्डने उजव्या बाजूला डाईव मारत एका हाताने अविश्वसनीय झेल टिपला.

https://www.instagram.com/p/CMPiHS7MxO3/?utm_source=ig_web_copy_link

एकाच षटकात ६ षटकार मारल्याचा व्हिडिओ देखील व्हायरल 

वेस्टइंडीज संघाचा कर्णधार कायरोन पोलार्डने श्रीलंकेविरुद्ध झालेल्या टी २० आंतरराष्ट्रीय सामन्यात ६ चेंडूत ६ षटकार लगावणाच्या विक्रम केला होता. हा विक्रम यापूर्वी युवराज सिंगने देखील केला आहे. त्याने इंग्लंड संघाविरुद्ध ६ चेंडूत ६ षटकार लगावले होते. पोलार्डने हा कारनामा अकिला धनंजयविरुद्ध फलंदाजी करत असताना केला होता. हा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता.

महत्वाच्या बातम्या:

पृथ्वी शॉचा झंझावात सुरूच! उपांत्य सामन्यातही तुफानी शतक ठोकत घातली या विक्रमांना गवसणी

बांग्लादेशविरूद्धच्या मालिकेसाठी न्यूझीलंडचा संघ जाहीर, विलियम्सनच्या अनुपस्थितीत या खेळाडूकडे नेतृत्वाची धुरा

भारतीय क्रिकेटची पहिली रनमशीन : विजय हजारे

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---