---Advertisement---

शाहरुखच्या ‘Jawan’बद्दल रिंकू म्हणाला ‘डिस्टर्ब करू नका…’, तर कार्तिकने केला प्रामाणिक रिव्ह्यू; वाचाच

On: शनिवार, सप्टेंबर 9, 2023 12:16 PM
Rinku-Singh-And-Dinesh-Karthik-And-Shahrukh-Khan
---Advertisement---

इंडियन प्रीमिअर लीग फ्रँचायझी कोलकाता नाईट रायडर्स संघाचा मालक शाहरुख खान याचा ‘जवान’ सिनेमा गुरुवारी (दि. 07 सप्टेंबर) जगभरात रिलीज झाला. सिनेमाने पहिल्या दिवशीच भारतात 65.50 कोटी आणि जगभरात 129.6 कोटी रुपयांची कमाईदेखील केली आहे. हा सिनेमा पाहण्याचा मोह केकेआर आणि भारतीय संघाचा स्टार खेळाडू रिंकू सिंग तसेच दिनेश कार्तिक यांनाही आवरला नाही. या दोघांनीही या सिनेमाचे कौतुक केले. रिंकूचा फोटोही व्हायरल होत आहे.

रिंकूचा फोटो व्हायरल
भारतीय संघाचा ‘बाजीगर’ रिंकू सिंग (Rinku Singh) याने किंग खान शाहरुख खान (Shahrukh Khan) याचा नवीन ‘जवान’ (Jawan) सिनेमा चित्रपटगृहात जाऊन पाहिला. अशात सिनेमा पाहतानाचा रिंकूचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रिंकूने पोस्ट शेअर करत “डिस्टर्ब करू नका. माझ्या आवडत्या शाहरुख खानला पाहतोय, लव्ह यू सर,” असे लिहिले.

https://www.instagram.com/p/Cw5PKlTr8mW/?img_index=1

काय म्हणाला कार्तिक?
दुसरीकडे, दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) यानेही ‘जवान’ सिनेमाचे तोंडभरून कौतुक केले. त्याने जवानचा रिव्ह्यू केला. त्याने ट्वीट करत जवानविषयी भाष्य केले. कार्तिकने अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ट्वीट करत लिहिले, “मला विश्वास आहे की, हा आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा भारतीय सिनेमा बनेल. काय अद्भूत प्रवास आहे. शाहरुख इतक्या साऱ्या अवतारात. माझा आवडता विक्रम राठोड आहे. शैली आणि असा करिश्मा शाहरुख खानमध्ये यापूर्वी कुणी कधीच पाहिला नव्हता. मला आठवते, जेव्हा 2018मध्ये मी केकेआरसोबत सुरुवात केली होती, आणि तेव्हाच ऍटलीने एसआरकेसोबत या सिनेमाविषयी चर्चा सुरू केली होती. आता वास्तवात तो चेन्नईमध्ये सीएसके विरुद्ध केकेआर सामन्यासाठी आला होता.”

कार्तिकने ट्वीटमध्ये पुढे लिहिले की, “यामध्ये 5 वर्षे लागली. इतक्या साऱ्या चर्चा, इतक्या छोट्या-छोट्या स्क्रिप्टमध्ये बदल आणि प्रत्येक गोष्टीला दृष्टीकोनातून ठेवणे, योग्य व्यावसायिक पद्धतीने इतक्या चांगल्याप्रकारे समोर आणणे, प्रत्येक फ्रेम इतकी मजेशीर बनवणे, स्टायलिश बनवणे…, संपूर्ण जवान टीमला खूप खूप शुभेच्छा…”

आता रिंकूचे फोटो आणि कार्तिकचे हे ट्वीट चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. चाहते या फोटोंवर आणि ट्वीटवर आपल्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया मांडत आहेत. (king shahrukh khan jawan movie cricketers rinku singh dinesh karthik react on it reaction read here)

हेही वाचाच-
‘शाहीन आफ्रिदी रोहितच्या डोक्यात…’, सर्वात वेगवान गोलंदाजाने सांगितलं ‘हिटमॅन’च्या बाद होण्याचे कारण
विश्वचषक संघातून बाहेर पडलेल्या शिखर धवनने घेतला महाकालचा आशीर्वाद, ‘खिलाडी’ अक्षय कुमारही दिसला सोबत

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---