संपूर्ण क्रिकेट विश्वाचे लक्ष सध्या आयपीएलकडे लागले आहे. येत्या १९ सप्टेंबरला आयपीएलला सुरुवात होईल. कोरोना विषाणूमुळे ही स्पर्धा यूएईमध्ये प्रेक्षकांविना रिकाम्या स्टेडियममध्ये खेळवली जाईल.
आयपीएलच्या आठ संघांपैकी अनिल कुंबळेच्या रूपात एकमेव भारतीय मुख्य प्रशिक्षक असणारा संघ म्हणजे, किंग्ज इलेव्हन पंजाब संघाला या हंगामात एक दिग्गज संघ म्हणून बघितले जाते. केएल राहुलकडे यंदा प्रथमच पंजाबचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे.
यंदाचा पंजाब संघ मजबूत संघ असल्याचे म्हटले जाते. संघाकडे जबरदस्त फ्लॅन्ज आणू गोलंदाज आहेत. त्यामुळे यूएईमध्ये २०१४ मध्ये झालेल्या आयपीएलप्रमाणे यंदाही पंजाब संघ अंतिम फेरी गाठेल असे चिन्ह आहे. या विशेष लेखात संघातील अशा ३ खेळाडूंबद्दल जाणून घेऊ जे या संघाला आयपीएल २०२० चे चषक मिळवून देऊ शकतात.
ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell)
या हंगामात किंग्ज इलेव्हन पंजाबची सर्वात मोठी आशा ऑस्ट्रेलियाच्या अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेलकडून असेल. त्याला या संघाने पुन्हा लिलावात विकत घेतले आहे. मॅक्सवेलने आतापर्यंत आयपीएलच्या ६९ सामन्यांत १३८७ धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राईक रेट १६१.१३ एवढा आहे. कोणत्याही प्रकारच्या गोलंदाजीचा सामना तो करू शकतो. तसेच त्याने संघासाठी उपयुक्त अशी गोलंदाजी देखील केली आहे.
आयपीएल २०१४ मध्ये ग्लेन मॅक्सवेलने याच युएईच्या मैदानावर जबरदस्त खेळी केली होती. एका सामन्यात त्याने सर्वाधिक १७ षटकार ठोकून एक विक्रम केला होता. त्याच खेळीची पुनरावृत्ती करण्याची अपेक्षा त्याकडून आहे.
मुजीब उर रहमान (Mujib ur Rehman)
अफगाणिस्तान संघाचा फिरकी गोलंदाज मुजीब उर रहमान मागील २ हंगामापासून आयपीएलमध्ये खेळात आहे. मागील हंगामात तो फक्त ५ सामने खेळला ३ बळी मिळवू शकला. परंतु सध्या तो जबरदस्त फॉर्ममध्ये आहे.
आयपीएलमध्ये खेळणाऱ्या अफगाणिस्तानच्या या दुसऱ्या खेळाडूला, मागील हंगामात चांगली करता आले नसले तरी, यंदा तो आपाल्या फिरकी गोलंदाजीची जादू दाखवू शकतो. आतापर्यंत त्याने आयपीएलचे १६ सामने खेळले असून त्यात १७ बळी मिळवले आहेत. त्याची फिरकी गोलंदाजी पंजाब संघाला यंदा उपयुक्त ठरेल.
केएल राहुल (KL Rahul)
किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचा नवा कर्णधार केएल राहुलने २०१८ आणि २०१९ या वर्षात अनुक्रमे ६५९ आणि ५९३ धावा केल्या आहेत. त्याने आयपीएलच्या कारकीर्दीत एकूण ६७ सामन्यात १३८.१५ च्या सरासरीने १९७७ धावा केल्या आहेत. यामध्ये १ शतक आणि १६ अर्धशतकांचा समावेश आहे.
आयपीएलमध्ये अवघ्या १४ चेंडूत वेगवान अर्धशतक करण्याचा विक्रमही राहुलच्या नावावर आहे. तो सध्या या छोट्या प्रकारातील क्रिकेटमध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये आहे आणि त्याकडे आता संघाचे कर्णधारपदी आहे.
आयपीएल २०२० – किंग्ज इलेव्हन पंजाबचे सामने
२० सप्टेंबर २०२०
विरुद्ध दिल्ली राजधानी
२४ सप्टेंबर २०२०
विरुद्ध चॅलेंजर्स बेंगलोर
27 सप्टेंबर २०२०
विरुद्ध राजस्थान रॉयल्स
०१ ऑक्टोबर २०२०
विरुद्ध मुंबई इंडियन्स
०४ ऑक्टोबर २०२०
विरुद्ध चेन्नई सुपर किंग
०८ ऑक्टोबर २०२०
विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद
१० ऑक्टोबर २०२०
विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स
१५ ऑक्टोबर २०२०
विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
१८ ऑक्टोबर २०२०
विरुद्ध मुंबई इंडियन्स
२० ऑक्टोबर २०२०
विरुद्ध दिल्लीची कॅपिटल्स
२४ ऑक्टोबर २०२०
विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद
२६ ऑक्टोबर २०२०
विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स
३० ऑक्टोबर२०२०
विरुद्ध राजस्थान रॉयल्स
o१ नोव्हेंबर २०२०
विरुद्ध चेन्नई सुपर किंग
संपूर्ण किंग्ज इलेव्हन पंजाब संघ –
केएल राहुल (कर्णधार), हरप्रीत ब्रार, ईशान पोरेल, मनदीप सिंग, जिमी नीशम, तजिंदर सिंग, ख्रिस जॉर्डन, करुण नायर, दीपक हूडा, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, ग्लेन मॅक्सवेल, मुजीब उर रहमान, सरफराज खान, शेल्डन कॉटरल, मयंक अग्रवाल, मोहम्मद शमी, दर्शन नलकंडे, निकोलस पूरण, ख्रिस गेल, मुरुगन अश्विन, जगदीश सुचित, कृष्णाप्पा गौतम, हार्डस विल्जॉइन, सिमरन सिंग.