आयपीएलमध्ये शनिवारी (10 ऑक्टोबर) झालेल्या थरारक सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने किंग्स इलेव्हन पंजाबला 2 धावांनी पराभूत केले. कोलकाताचा फिरकीपटू सुनील नरेन आणि मध्यमगती गोलंदाज प्रसिध्द कृष्णाने अखेरच्या षटकांत शानदार गोलंदाजी केली. पंजाबचा कर्णधार केएल राहुलने केलेल्या 74 धावांच्या खेळीनंतरही पंजाब संघ अखेरच्या चार षटकांत जिंकण्यासाठी आवश्यक असलेल्या 29 धावा करू शकला नाही. या पराभवानंतर पंजाब संघाच्या अधिकृत ट्विटवर अकाउंटवरची पोस्ट पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटल.
165 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या पंजाबने पहिल्या विकेटसाठी 115 धावांची भागीदारी केली होती, असं वाटत होतं की पंजाब सहजपणे सामना जिंकेल. शेवटच्या 2 षटकांत पंजाबला 20 धावांची गरज होती. अखेरच्या षटकांत नरेन आणि कृष्णा यांनी टिच्चून मारा केल्या आणि केकेआरला विजय मिळवून दिला.
अखेरच्या चेंडूवर पंजाबला 7 धावा करायच्या होत्या पण मॅक्सवेलने केवळ चौकार ठोकू शकला. अशाप्रकारे, केकेआरने थरारक सामन्यात 2 धावांनी विजय मिळविला. या पराभवामुळे किंग्ज इलेव्हन पंजाबला प्लेऑफच्या शर्यतीत आपले स्थान टिकवून ठेवणे कठीण झाले आहे. कारण हा त्यांचा यंदाच्या आयपीएल मोसमातील 6 वा पराभव आहे.
या पराभवानंतर पंजाबने लगेच ट्विट केले, जे खूप व्हायरल होत आहे. या ट्विटमध्ये फक्त पूर्णविरामांचा वापर केला आहे. असे ट्विट करून पंजाब संघाने या पराभवाचे स्पष्टीकरण देण्यास काहीच शब्द नसल्याचे दर्शविण्याचा प्रयत्न केला असल्याचे वाटत आहे.
………………..
— Punjab Kings (@PunjabKingsIPL) October 10, 2020
या सामन्यात केकेआरने प्रथम फलंदाजी करत 20 षटकांत 6 गडी गमावून 164 धावा केल्या होत्या. केकेआरसाठी कर्णधार दिनेश कार्तिकने उत्तम फलंदाजी केली आणि 29 चेंडूत 58 धावा केल्या. सामन्यादरम्यान कार्तिकने संघाचे अतिशय उत्तमपणे नेतृत्व केले आणि केकेआरला रोमांचक सामन्यात विजय मिळवून दिला. त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
महत्त्वाच्या बातम्या-
-विराटने धोनीची घेतलेली गळाभेट पाहून चाहत्यांनाही झाला आनंद, पाहा व्हिडिओ
-आला रे! हैदाराबादविरुद्धच्या सामन्यातून राजस्थानचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सचे पुनरागमन
-महिला आयपीएल: बीसीसीआयने घोषित केले वेळापत्रक आणि संघ; पाहा कोणाला मिळाली कर्णधारपदी संधी
ट्रेंडिंग लेख-
-‘नरेल एक्सप्रेस’ : तब्बल १५ शस्त्रक्रिया होऊनही फलंदाजावर आग गोळे फेकणारा अवलिया गोलंदाज
-फलंदाजीत लईच भारी! ‘या’ ३ संघांचा आयपीएल २०२०मध्ये नादच खुळा
-आयपीएलमध्ये ‘या’ ४ खेळाडूंना कोणत्याही क्षणी संघ देऊ शकतात नारळ