टी20 चा स्टार फलंदाज आणि ‘युनिव्हर्सल बॉस’ ख्रिस गेल आयपीएलच्या या हंगामात किंग्स इलेव्हन पंजाबचा भाग आहे. मात्र या हंगामात त्याने एकही सामना खेळलेला नाही. त्याच्या पुनरागमनाच्या चर्चा होत असतानाच अन्नातून झालेल्या विषबाधेमुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण आता तो तंदरुस्त असून नेटमध्ये सराव करत आहे. तो पुढील सामना खेळण्यासाठी तंदरुस्त आहे असे संकेत पंजाबच्या सोशल मीडिया अकाउंटवरून शेयर केलेल्या पोस्टमध्ये देण्यात आले आहे.
https://www.instagram.com/p/CGSShYWJxbe/
पंजाब संघ गुणतालिकेत सध्या तळाशी आहे. किंग्स इलेव्हन पंजाबचा सहायक प्रशिक्षक वसीम जाफर म्हणाला की,“गेल पुढील सामना खेळण्यासाठी सज्ज दिसत आहे आणि तो पुनरागमन करण्यासाठी तयार आहे. तो प्रशिक्षण घेत आहे आणि नेटमध्ये उत्तम फलंदाजी करत आहे.”
🗣 @henrygayle's special message for you fans 😍
How does it feel? 👇🏻#SaddaPunjab #IPL2020 #KXIP pic.twitter.com/HcZ6QlV4B6
— Punjab Kings (@PunjabKingsIPL) October 13, 2020
41 वर्षीय गेल सनरायझर्स हैदराबादविरुद्ध 8 ऑक्टोबरला झालेल्या सामन्यात खेळू शकला नव्हता. त्यावेळी संघ प्रशिक्षक अनिल कुंबळे म्हणाला की, “गेल हैदराबादविरुद्ध होणाऱ्या सामन्यात खेळणार होता पण तो आजारी असल्यामुळे खेळू शकला नाही. त्याला अन्नातून विषबाधा झाली आहे. म्हणून त्याची निवड प्लेयिंग इलेव्हन मध्ये केली गेली नाही.”
गेलनेही दवाखान्यात ऍडमिट असलेला एक फोटो सोश मीडियावर शेअर केला होता आणि तो लवकरच यातून बाहेर येईल असेही त्याने त्यावेळी म्हटले होते.
https://www.instagram.com/p/CGK9-9XF7oa/
पंजाबसाठी फलंदाजी हा चिंतेचा विषय आहे. सलामीवीर केएल राहुल आणि मयंक अगरवाल व्यतिरिक्त कोणत्याही फलंदाजाने या हंगामात खास कामगिरी केलेली नाही. पंजाब संघ गुणतालिकेत तळाशी असण्यामागे फलंदाजीतील अपयश हे एक मोठे कारण आहे. गेलच्या पुनरागमनामुळे हा संघ कशी कामगिरी करेल हे पाहावं लागेल.
महत्त्वाच्या बातम्या –
IPL 2020: आज दिल्ली-राजस्थान येणार आमने-सामने, जाणून घ्या सामन्याबद्दल सर्वकाही
फिरकीने भल्याभल्यांना घाम फोडणाऱ्या राशिदविरुद्ध धावा करायच्यात ना? सेहवागच्या ‘या’ टिप्स ऐका
वाह क्या बात है! धोनीचा अवघड झेल घेण्यात अपयशी ठरल्यानंतरही होतेयं संदीपचं कौतुक, पाहा व्हिडिओ
ट्रेंडिंग लेख –
वाढदिवस विशेष: क्रिकेटचा गंभीर शिलेदार
IPL : पंजाबकडून शतक करणारे ३ खेळाडू, जे आज कोणाच्या लक्षातही नाहीत
स्वार्थी राजकारणामुळे देशाने गमावलेला अस्सल हिरा.! ७० व्या वर्षापर्यंत क्रिकेट खेळलेले एकमेव खेळाडू