मुंबई । भारताचा फलंदाज केएल राहुलही कोरोना वॉरियर्सच्या मदतीसाठी पुढे आला आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी त्यांने बंगळुरू विमानतळाच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या सीआयएसएफ जवानांना फेस शील्ड दिले आहे.
राहुल म्हणाला की, “सीआयएसएफचे जवान रात्रंदिवस आपल्याला संरक्षण देत आहेत. आपल्याला आरामात जगता यावे यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करत आहेत. त्यांना ही सुरक्षितता उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. ही केवळ माझीच नाही, तर आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. आमच्या दिशेने हा एक छोटा प्रयत्न आहे.”
राहुलने यापूर्वीही गरजूंना केली आहे मदत
आयपीएल २०२०च्या हंगामात किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचे नेतृत्व करणारा राहुल हा त्या खेळाडूंपैकी एक आहे, जे या कठीण काळात कोरोना विरुद्ध लढणाऱ्या कामगारांना मदत करत आहेत. त्याने यापूर्वीही लोकांची मदत केली आहे. थॅलेसेमिया रूग्णांच्या उपचारासाठी त्याने विश्वचषकातील त्याची जर्सी आणि किट दान केले होते.
केएल राहुल पहिल्यांदा आयपीएलमध्ये पंजाबचे करणार नेतृत्व
राहुल 19 सप्टेंबरपासून आयपीएलसाठी चार्टर्ड विमानाने यूएईला दाखल झाला आहे. फ्लाइटमधून त्याचे एक फोटोही समोर आले होते, ज्यामध्ये तो पीपीई कीट परिधान करताना दिसला होता. यूएईमध्ये आगमन करणारे सर्व खेळाडू आणि कर्मचाऱ्यांना 7 दिवसांसाठी क्वारंटाईन ठेवण्यात येईल. दरम्यान, केवळ तीन कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्यानंतरच प्रत्येकास जैव-सुरक्षित वातावरणात प्रवेश मिळेल. स्पर्धेच्या प्रत्येक 5 व्या दिवशी प्रत्येकाची कोरोना चाचणी होईल.
गेल्या हंगामात राहुलने 593 धावा केल्या
या हंगामात राहुल पहिल्यांदा आयपीएल संघाचा कर्णधार असणार आहे. गेल्या सत्रात त्याने 14 सामन्यांत 135.38 च्या स्ट्राइक रेटने 593 धावा केल्या. यादरम्यान त्याने शतकही ठोकले होते. त्याने आतापर्यंत 67 आयपीएल सामने खेळले आहेत. यात त्याने 42.06 च्या सरासरीने 1977 धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
-तिसऱ्या कसोटीत इंग्लंडने रचला धावांचा डोंगर; पाकिस्तान पुन्हा ‘बॅकफूट’वर
-सीपीएलच्या इतिहासातील सर्वात कमी धावांचे आव्हान पूर्ण करण्यात ‘या’ संघाला अपयश
-सुनिल नरेन एक्सप्रेस काही थांबेना, धडाकेबाज कामगिरी करत नाईट रायडर्सला दिला शानदार विजय
ट्रेंडिंग लेख-
-आपल्या समालोचनातून चौफेर फटकेबाजी करणारा ऍलन विल्किंंस
-क्रिकेटपटू म्हणून नाव कमावूनही नेहमीच स्वत: ला एक शिक्षक मानणारा क्रिकेटर
-जेव्हा भारतीय क्रिकेटचे पितामह रणजीतसिंग यांनी एकाच दिवशी केली होती २ शतके…