पुणे। ग्रँड स्लॅम टेनिस अकादमी यांच्या तर्फे आयोजित व एमएसएलटीए आणि एआयटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या एमएसएलटीए-ग्रँड स्लॅम टेनिस अकादमी चॅम्पियनशीप सिरीज 12 वर्षांखालील राष्ट्रीय मानांकन टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत मुलांच्या गटात आर्यन किर्तने याने तर, मुलींच्या गटात शिबानी गुप्ते या खेळाडूंनी मानांकित खेळाडूंवर सनसनाटी विजय मिळवत आजचा दिवस गाजवला.
नटराज टेनिस कोर्ट, कर्वेनगर येथील टेनिस कोर्टवर सुरु असलेल्या स्पर्धेत मुख्य ड्रॉच्या पहिल्या फेरीत मुलांच्या गटात बिगरमानांकीत आर्यन किर्तने याने तिसऱ्या मानांकित वेदांग गायकवाडचा 6-0, 6-0 असा एकतर्फी पराभव करून सनसनाटी निकाल नोंदवला. अव्वल मानांकित स्मित उंडरेने आरव छल्लाणीचा 6-0, 6-4 असा तर, क्वालिफायर नीरज जोर्वेकर याने नमिश हूडचा 6-2, 6-3 असा सरळ सेटमध्ये पराभव केला.
मुलींच्या गटात शिबानी गुप्ते हिने तिसऱ्या मानांकित सृष्टी सूर्यवंशीचा 4-6, 7-5, 6-0 असा तीन सेटमध्ये पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदवला. चुरशीच्या लढतीत ईरा कुलकर्णीने श्राव्या लबडेवर टायब्रेकमध्ये 6-7(5), 7-6(5), 7-5 असा पराभव करून आपले आव्हान कायम राखले.
निकाल: मुख्य ड्रॉ(पहिली)फेरी:
मुले:
स्मित उंडरे[1] वि.वि.आरव छल्लाणी 6-0, 6-4;
नीरज जोर्वेकर वि.वि.नमिश हूड 6-2, 6-3;
कियान पटेल वि.वि.नील देसाई 6-1, 6-4;
आर्यन किर्तने वि.वि.वेदांग गायकवाड[3] 6-0, 6-0;
वीरेन चौधरी(5)वि.वि.अझलन शेख 6-4, 6-2;
आरव बेले[8] वि.वि.मिहीर काळे 6-0, 6-2;
मुली:
स्वरा जावळे[1] वि.वि.हर्षा देशपांडे 6-1, 6-1;
ईरा कुलकर्णी वि.वि.श्राव्या लबडे 6-7(5), 7-6(5), 7-5;
वीरा हरपुडे वि.वि.रिया बंगले 6-1, 6-0;
काव्या पांडे[5] वि.वि.मीरा बंगले 6-1, 6-0;
अनुष्का जोगळेकर[6] वि.वि.ख्याती मनीष 6-0, 6-1;
शिबानी गुप्ते वि.वि.सृष्टी सूर्यवंशी[3] 4-6, 7-5, 6-0;
श्रावी देवरे वि.वि.सान्वी राजू 6-0, 6-1.
महत्त्वाच्या बातम्या –
कोरोनामुळे ट्वीटरवर ‘कॅन्सल आयपीएल’ ट्रेंडला, जाणून घ्या मुंबई आणि सीएसकेचे चाहेते का होतायत ट्रोल?
रॅली ड्रायव्हर संजयचे अडीच वर्षांनी पुनरागमन, थायलंडमधील क्रॉसकंट्री रॅली मालिकेतील सहभागासाठी सज्ज
IPL2022| लखनऊ वि. बेंगलोर सामन्यासाठीची ‘ड्रीम ११’, हे खेळाडू करून देऊ शकतात पैसा वसूल!