मुंबई । पाकिस्तानचा सर्वसमावेशक युवा वेगवान गोलंदाज वयाच्या 17 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दमदार पदार्पण केले. त्याचा वेग आणि स्विंग विषा सारखाच भासायचा. नशीब त्याला यशाकडे घेऊन जात असताना अचानकपणे मॅच फिक्सिंगचा स्पर्श त्याच्या कारकिर्दीला झाला. आमिरचे भवितव्य अंधारमय होण्याची शक्यता वाटू लागली, पण पीसीबीने त्यांच्याकडची गुणवत्ता पाहून दया दाखवली आणि त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याची संधी दिली.
2016 साली न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करत दमदार कामगिरी करुन मोहम्मदने जुन्या जखमांचा हिशेब चुकता केला. भेदक गोलंदाजीने भल्याभल्या फलंदाजांच्या मुसक्या आवळणारा मोहम्मद आमिर सर्वोत्तम वेगवान गोलंदाज असल्याचे प्रमाणपत्र ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज स्टीव्ह स्मिथ याने दिले आहे.
स्टीव्ह स्मिथ याला त्याच्या कारकीर्दीत कोणत्या वेगवान गोलंदाजाने सतावले, असा प्रश्न क्रिकेट फॅन्सने विचारला. त्यावर स्टीव्ह स्मिथने पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिर याचे नाव घेतले.
https://twitter.com/Asaleem2605/status/1272128687173799938?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1272162425530396674&ref_url=https%3A%2F%2Fwww.timesnownews.com%2Fsports%2Fcricket%2Farticle%2Fkisi-hater-ki-opinions-se-wo-kharab-nhi-hojayege-mohammad-amirs-wife-shuts-down-troll-in-style%2F606774
प्रतिस्पर्धी संघात धडकी भरवणारा वेगवान गोलंदाज आमिर यांच्या गोलंदाजीने अनेक जण प्रभावित झाले आहेत. असे असले तरी त्याने केलेले मॅच फिक्सिंग प्रकरण क्रिकेट फॅन्स अजूनही विसरले नाहीत. स्टीव्ह स्मिथच्या उत्तरावर एका क्रिकेट फॅनने आमिरला ट्रोल करण्याचा प्रयत्न केले. त्यावेळेस आमिरची पत्नीने त्या क्रिकेट फॅनला सडेतोड उत्तर दिले.
Yes aur kisi hater ki opinions se wo kharab nhi hojaye ge. It just shows level of jealousy and honestly jealousy takes no body no where may Allah give u guys SHIFA , https://t.co/0EMVqdAdK2
— Narjis amir (@narjiskhan25) June 14, 2020
स्टीव्ह स्मिथने त्याला मोहम्मद आमिरने खूप सतावले असल्याचे सांगितले होते. एका पाकिस्तानी फॅन स्टीव्ह स्मिथचा हा व्हिडिओ त्याच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर करत लिहिले की, “मला मोहम्मद आमिर आवडत नाही. तो कुणी महान असल्याचे सांगितले तरी तो महान होणार नाही. तो सर्वात भ्रष्ट आणि खूप वाईट माणूस आहे.”
मोहम्मद आमिर बद्दल पाकिस्तानी क्रिकेट फॅनने दिलेली प्रतिक्रिया आमिरची पत्नी नरजिस खान हिला आवडले नाही. त्या फॅनला प्रत्युत्तर देताना तिने लिहिले की, “आमिरला लोक वाईट म्हणत असले तरी तो वाईट होणार नाही. त्याला वाईट म्हणून आपल्यातली जळकी वृत्ती दिसून आली.”
मोहम्मद आमिरने 2009 साली वयाच्या सतराव्या वर्षी श्रीलंकेविरुद्धच्या गॉल कसोटीत सामन्यात पदार्पण केले होते. पहिल्याच कसोटी सामन्यात भेदक गोलंदाजी करत दोन्ही डावात मिळून सहा गडी बाद केले. 2010 साली इंग्लंडविरुद्ध लॉर्ड्स येथे खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात तो स्पॉट फिक्सिंगमध्ये सामील झाला होता. त्यानंतर आयसीसीने त्याला पाच वर्षांची बंदी घातली होती. 2016 साली त्याने क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन केले.
मोहम्मद आमीरने 36 कसोटी सामन्यात119 बळी, 61 वनडे सामन्यात 81 बळी आणि 48 टी टवेंटी सामन्यात 59 बळी टिपले.