---Advertisement---

भारताविरुद्धच्या वनडे मालिकेला न्यूझीलंडचे हे प्रमुख गोलंदाज मुकणार; असा आहे न्यूझीलंड संघ

---Advertisement---

सध्या भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर (New Zealand) आहे. या दौऱ्यात भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध (India vs New Zea land) 5 सामन्यांची आंतरराष्ट्रीय टी20 मालिका  खेळत आहे. या मालिकेनंतर 5 फेब्रुवारीपासून भारत विरुद्ध न्यूझीलंड संघान वनडे मालिका खेळणार आहे. या वनडे मालिकेसाठी न्यूझीलंडने आज त्यांचा 14 जणांचा संघ घोषित केला आहे.

न्यूझीलंडचे ट्रेंट बोल्ट (Trent Boult), लॉकी फर्ग्यूसन (Lockie Ferguson) आणि मॅट हेन्री (Matt Henry) हे प्रमुख गोलंदाज दुखापतग्रस्त असल्याने त्यांना भारताविरुद्ध वनडे मालिकेसाठी संधी देण्यात आलेली नाही.

त्यांच्याऐवजी या वनडे मालिकेसाठी हमिश बेनेट (Hamish Bennett) आणि स्कॉट कुगेलेइजन (Scott Kuggeleijn), काइल जेमिसनला (Kyle Jamieson) या खेळाडूंना न्यूझीलंड संघात संधी देण्यात आली आहे.

त्यामुळे जेमिसनला या वनडे मालिकेतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळू शकते. तसेच बेनेट आणि कुगेलेइजन 2017 ला शेवटचे वनडे सामने खेळले आहे. त्यानंतर आता त्यांची पुन्हा वनडे मालिकेसाठी निवड झाली आहे.

तसेच न्यूझीलंडच्या संघात यष्टीरक्षक फलंदाज टॉम लॅथमचे (Tom Latham) पुनरागमन झाले आहे. तो मागील काही दिवसापासून उजव्या हाताच्या बोटाला दुखापत झाल्याने न्यूझीलंड संघातून बाहेर होता.

तसेच भारताविरुद्धच्या वनडे मालिकेतील केवळ पहिल्या सामन्यासाठी फिरकी गोलंदाज इश सोधीला संधी देण्यात आली आहे. पहिल्या सामन्यानंतर तो भारत अ संघा विरुद्ध कसोटी सामना खेळण्यासाठी न्यूझीलंड अ संघात सामील होईल.

असा आहे भारतविरुद्ध वनडे मालिकेसाठी न्यूझीलंडचा संघ-

केन विलियम्सन (कर्णधार), हमीश बेनेट, टॉम ब्लंडेल, कोलिन डी ग्रँडहोम, मार्टिन गप्टिल, काइल जेमिसन, स्कॉट कुगेलेइझन, टॉम लॅथम, जिमी नीशम, हेन्री निकोल्स, मिशेल सँटनर, इश सोधी (पहिला वनडे), टिम साउथी, रॉस टेलर

https://twitter.com/Maha_Sports/status/1222798027187843072

https://twitter.com/Maha_Sports/status/1222816854198013952

 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---