---Advertisement---

‘माझ्यासाठी आयपीएल म्हणजेच…,’ आंद्रे रसेलच्या त्या विधानाने जिंकली कोट्यावधी भारतीयांची मने

On: सोमवार, एप्रिल 12, 2021 12:51 PM
---Advertisement---

आयपीएलचे 14 वे सत्र सुरू झाले असून आतापर्यंत खेळल्या गेलेल्या सुरुवातीच्या तीन सामन्यांमध्ये बरेच रोमांचक प्रसंग पाहायला मिळाले आहेत. कोरोना विषाणूमुळे आयपीएलचे मागील सत्र दुबईमध्ये आयोजित करण्यात आले होते. मात्र यानंतर बीसीसीआयने हा निर्णय बदलून यंदाची आयपीएल स्पर्धा भारतात घेण्याचा निर्णय घेतला आहे.

आयपीएल स्पर्धा भारतात परतल्यानंतर सर्व खेळाडूंकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. यामध्ये वेस्ट इंडिजचा 32 वर्षीय अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेल यानेही वक्तव्य आहे. त्याने आयपीएलसंबंधी एक मोठे विधान करून भारतीय क्रिकेटप्रेमींची मने जिंकली आहेत.

कोलकाता नाईट रायडर्सचे प्रतिनिधित्त्व करत असलेल्या रसेलने आयपीएलमधील आपल्या खेळीबद्दल भाष्य केले आहे. तो म्हणाला की, “गेल्या वर्षाच्या तुलनेत आता मी चांगल्या स्थितीत आहे. त्यामुळे मागच्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी माझ्या कामगिरीत सुधारणा दिसून येतील. तसेच मी खूप तंदुरुस्त असल्यामुळे मी माझ्या खेळीमध्ये शरीराचे पूर्ण योगदान देण्याचा प्रयत्न करणार आहे.”

2012 पासून आयपीएल लीगचा भाग असलेला आंद्रे रसेल आयपीएलचे कौतुक करताना पुढे म्हणाला की, “आम्ही सध्या भारतात परतलो असून ही आमच्यासाठी सर्वात चांगली गोष्ट आहे. युएई ही सुद्धा एक चांगली जागा होती, परंतु आम्ही जेव्हा जेव्हा आयपीएलबद्दल बोलतो तेव्हा याचा अर्थ आपण भारताबद्दल बोलत आहोत असा होतो.”

रसेलने आपल्या आयपीएल कारकीर्दीची सुरुवात 2012 मध्ये केली होती. त्यानंतर त्याने आपल्या 9 वर्षांच्या आयपीएल कारकिर्दीत एकूण 75 सामने खेळले असून यामध्ये त्याने गोलंदाजी करताना एकूण 62 बळी घेतले आहेत; तर त्याच वेळी 29.27 च्या फलंदाजीच्या सरासरीने एकूण 1522 धावा केल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

मुंबई इंडियन्सला गवसला कोहिनूर! धाकट्या भावानंतर थोरल्याला दिली जागा, ‘अशी’ राहिलीय त्याची कामगिरी

“जोफ्रा आर्चरचं नसणं राजस्थान संघासाठी मोठा धक्का,” पंजाब विरुद्धच्या लढतीपुर्वी संगकाराने व्यक्त केली चिंता

भिडू नंबर १! अर्धशतक केल्यानंतर नितीश राणाचे अनोखे सेलिब्रेशन, पण कोणासाठी? ऐका त्याच्याच तोंडून

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---