इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) पुढील हंगामाचे बिगुल वाजले आहे. स्पर्धेतील मूळ आठ संघांना प्रत्येकी चार खेळाडू रिटेन करण्याची संधी देण्यात आली होती. ३० नोव्हेंबर रोजी झालेल्या या प्रक्रियेत सर्व संघांनी मिळून २७ खेळाडूंना आपापल्या संघात कायम राखले. यानंतर आता दोन नव्या संघांना रिटेन न केल्या गेलेल्या खेळाडूंमधून प्रत्येकी तीन खेळाडू निवडायचे आहेत. त्यानंतर उर्वरित खेळाडूंचा मेगा लिलाव होईल. मात्र, या मेगा लिलावाच्या प्रक्रियेवर काही आयपीएल संघांनी आक्षेप नोंदविला आहे.
या संघाने नोंदविला आक्षेप
आयपीएलचे दोनदा विजेतेपद पटकावणारा संघ कोलकता नाईट रायडर्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी वेंकी मैसूर यांनी रिटेंशन व लिलावाबाबत नाराजी व्यक्त केली. रिटेंशननंतर बोलताना ते म्हणाले,
“लीगमध्ये आता असा एक काळ आला आहे की, हा मेगा लिलाव गरजेचा वाटत नाही. तुम्ही नव्या येणाऱ्या खेळाडूंसाठी ड्राफ्ट पद्धती वापरू शकता. तुम्ही खेळाडूंना आपापसात ट्रेड करू शकता अथवा लोनवर देऊ शकता, अशी पद्धत सुरू करायला हवी.'”
कोलकाताने या रिटेंशनमध्ये आंद्रे रसेल, सुनील नरीन, व्यंकटेश अय्यर व वरूण चक्रवर्ती या चौघांना कायम ठेवले. मात्र, शुबमन गिल, राहुल त्रिपाठी, नितीश राणा व पॅट कमिन्स यासारखे दर्जेदार खेळाडू त्यांना करारमुक्त करावे लागले. कोलकाताने आयपीएल २०२१ मध्ये अंतिम फेरीपर्यंत प्रवास केला होता.
हे अत्यंत दुःखदायक
कोलकाता पाठोपाठ दिल्ली कॅपिटल्सचे सह संघमालक पार्थ जिंदाल यांनीदेखील या प्रक्रियेविषयी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले,
“ही पद्धत अत्यंत चुकीची वाटते. तुम्ही अनेक युवा खेळाडूमध्ये गुंतवणूक करता त्यांना तयार करता आणि त्यानंतर ते अशा रीतीने इतर संघांत जातात. या ठिकाणी खेळून नंतर ते आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करत असतात. आमच्या प्रमुख खेळाडूंचे जाणे त्रासदायक आहे.”
आयपीएल २०२२२ साठी दिल्लीने कर्णधार रिषभ पंत, अक्षर पटेल, पृथ्वी शॉ व एन्रिक नॉर्किए यांना कायम केले. श्रेयस अय्यर, रविचंद्रन अश्विन, कगिसो रबाडा व मार्कस स्टॉयनिस यासारखे आंतरराष्ट्रीय खेळाडू दिल्लीला कायम राखता आले नाहीत. मेगा लिलावात या खेळाडूंना संघात सामील करून घेण्यासाठी दिल्ली संघ व्यवस्थापन प्रयत्न करेल.
महत्त्वाच्या बातम्या-
कडक!! नवदीप सैनीच्या गोलंदाजीवर फलंदाज क्लीन बोल्ड; ४ ते ५ फूट लांब उडला स्टंप
दुसऱ्या कसोटीत पाऊस बिघडवणार भारत-न्यूझीलंडचा खेळ? पाहा कसे असेल मुंबईचे हवामान
हरभजन सिंगने निवडली कसोटीतील सर्वकालिक ‘प्लेइंग ११’, या खेळाडूला दिली विवियन रिचर्ड्सची उपाधी