---Advertisement---

IPL BREAKING| मुंबईकर श्रेयसकडे केकेआरची धुरा! आगामी हंगामात करणार कोलकाताचे नेतृत्व

On: बुधवार, फेब्रुवारी 16, 2022 4:24 PM
shreyas-iyer
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग २०२२ (आयपीएल २०२२) चा बिगुल वाजला आहे. १२ व १३ फेब्रुवारी रोजी बेंगलोर येथे पार पडलेल्या मेगा लिलावानंतर सर्व संघांची तयारी सुरू झाली आहे. आयपीएलमधील यशस्वी संघांपैकी एक असलेल्या कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) (KKR) संघाने या आगामी हंगामासाठी आपल्या नवीन कर्णधाराची घोषणा केली. भारतीय संघाचा मधल्या फळीतील विश्वासू फलंदाज श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) याच्याकडे संघाचे नेतृत्व देण्यात आले आहेत. केकेआरने ट्विट करत याबाबत माहिती दिली.

आयपीएल २०२१ मध्ये कोलकाता संघाचे नेतृत्व इंग्लंडच्या ओएन मॉर्गनने केले होते. त्याच्या नेतृत्वात संघ अंतिम फेरीपर्यंत पोहोचलेला. मात्र, कोलकाता संघ व्यवस्थापनाने त्याला नव्या हंगामासाठी रिटेन केले नाही. मेगा लिलावात श्रेयस अय्यरवर साडेबारा कोटी रुपयांची बोली लावत कोलकाता संघाने त्याला आपल्या ताफ्यात सामील करून घेतले. त्यानंतरच संघाचे नेतृत्व करणार असल्याचे सांगितले जात होते. आता यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

श्रेयसकडे नेतृत्वाचा अनुभव

भारतीय संघातील महत्त्वाचा सदस्य असलेला श्रेयस यापूर्वी दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळत होता. त्याने, तीन वर्ष संघाचे नेतृत्व केले होते. त्याच्या नेतृत्वात दिल्ली संघाने २०१९ मध्ये प्ले ऑफ तर २०२० मध्ये अंतिम फेरीपर्यंत धडक दिली होती. २०२१ मध्ये तो दुखापतग्रस्त झाल्याने त्याच्या जागी रिषभ पंतकडे नेतृत्व देण्यात आले. श्रेयस पुन्हा संघात सामील झाल्यानंतर त्याला नेतृत्व करू दिले नाही. त्यामुळे श्रेयसने आगामी हंगामासाठी रिटेन न होण्याचा निर्णय घेतला.

आगामी हंगामासाठी कोलकाता संघ-

आंद्रे रसेल, वरुण चक्रवर्ती, व्यंकटेश अय्यर, सुनील नरेन, पॅट कमिन्स, नितीश राणा, श्रेयस अय्यर, शिवम मावी, शेल्डन जॅक्सन, अजिंक्य रहाणे, रिंकू सिंग, अनुकुल रॉय, रसिक दार, बाबा इंद्रजित, चमिका करुणारत्ने, अभिजित तोमर, प्रथम सिंग, अशोक शर्मा, सॅम बिलिंग्ज, ऍलेक्स हेल्स, चीम साऊथी, रमेश कुमार, उमेश यादव, मोहम्मद नबी, अमन खान.

महत्वाच्या बातम्या-

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---