आयपीएलमध्ये कोलकाता नाइट रायडर्सचा अनुभवी फलंदाज मनीष पांडेने (Manish Pandey) आगामी आयपीएल 2025 मेगा लिलावापूर्वी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. त्याला पुन्हा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) कडून खेळण्याची संधी मिळाली तर खूप मोठी गोष्ट असेल, असे त्याने म्हटले आहे. मनीष पांडेच्या मते, कर्नाटकच्या प्रत्येक युवा खेळाडूला आरसीबीकडून आयपीएलमध्ये खेळायचे आहे.
जर आपण मनीष पांडेबद्दल बोललो तर, त्याने त्याच्या आयपीएल कारकिर्दीची सुरुवात आरसीबीकडून खेळून केली. आयपीएल 2009 मध्येही त्याने एक मोठा विक्रम केला होता. आरसीबीकडून खेळताना मनीष पांडेने डेक्कन चार्जर्सविरुद्ध शानदार शतक झळकावले होते. त्याने 73 चेंडूत 114 धावांची शानदार खेळी केली होती. यासह तो आयपीएलमध्ये शतक झळकावणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला होता. त्याचा हा विक्रम असा आहे की तो कधीही मोडणार नाही.
आरसीबीनंतर मनीष पांडेने केकेआरकडून अनेक हंगाम खेळले आणि त्यांना चॅम्पियन बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. यानंतर तो सनरायझर्स हैदराबादसह इतर काही संघांचा भाग बनला. गेल्या मोसमात मनीष पांडे केकेआरकडून खेळला होता. मात्र आता त्याला पुन्हा आरसीबीमध्ये पुनरागमन करायचे आहे.
आरसीबीकडून पुन्हा खेळणे खूप छान होईल – मनीष पांडे
मनीष पांडेने टीव्ही 9 कन्नडशी बोलताना आरसीबीकडून खेळण्याची इच्छा व्यक्त केली. तो म्हणाला, “माझे होमटाउन असल्याने मला पुन्हा आरसीबीकडून खेळायला आवडेल. फक्त मीच नाही तर कर्नाटकच्या प्रत्येक युवा खेळाडूला एक दिवस आरसीबीकडून खेळायला आवडेल.”
Manish Pandey said, “as a hometown boy, I would love to be back playing for RCB. Not just me, all the youngsters from Karnataka would love to play for RCB one day”. (TV9 Kannada). pic.twitter.com/R96jw5GDUG
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) August 19, 2024
रिंकू सिंगनेही आरसीबीकडून खेळण्याची इच्छा व्यक्त केलीय
याआधी केकेआरच्या आणखी एका खेळाडूने, रिंकू सिंगनेही आरसीबीकडून खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. रिंकूने स्पोर्ट्स तकशी एका खास संभाषणात सांगितले की, “जर त्याला केकेआरने सोडले तर त्याला आरसीबीकडून खेळायला आवडेल, कारण या संघात विराट कोहलीचा समावेश आहे.”
महत्त्वाच्या बातम्या-
बांगलादेश क्रिकेटमध्ये भूकंप, ‘या’ दिग्गजाने दिला आपल्या पदाचा राजीनामा
‘आधी 10 रुपये, आता संपूर्ण आयुष्याची कमाई…’, विनेश फोगटला भावाकडून रक्षाबंधनचे खास गिफ्ट
बाॅर्डर गावसकर ट्राॅफीपूर्वी ऑस्ट्रेलिया दिग्गजाने दिला भारताला इशारा…!