आयपीएल 2023 मध्ये शनिवारी (16 एप्रिल) मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स हा सामना खेळला गेला. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात केकेआर ने प्रथम फलंदाजी करताना मोठे धावसंख्या उभारली. केकेआरसाठी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या युवा वेंकटेश अय्यरने दमदार शतक झळकावले.
💯 for @venkateshiyer! 👏 👏
This has been a stunning knock ⚡️ ⚡️
He has overcome an injury to notch up his maiden IPL TON! 💪 💪
Follow the match ▶️ https://t.co/CcXVDhfzmi#TATAIPL | #MIvKKR | @KKRiders pic.twitter.com/BiNC0gDDbJ
— IndianPremierLeague (@IPL) April 16, 2023
सलामीचा फलंदाज एन जगदीशन दुसऱ्या षटकात बाद झाल्यानंतर अय्यर मैदानात उतरला. या हंगामात चांगल्या फॉर्ममध्ये दिसत असलेल्या अय्यरने सुरुवातीपासून मुंबईच्या गोलंदाजांवर आक्रमण केले. दरम्यान त्याने हंगामातील आपले तिसरे अर्धशतक पूर्ण केले. या खेळीनंतरही त्याच्या धावांचा वेग थांबला नाही. त्याने 17 व्या षटकात 49 चेंडूवर 6 चौकार व 9 षटकारांच्या मदतीने आपले पहिले आयपीएल शतक पूर्ण केले. आयपीएलमध्ये केकेआरसाठी ब्रेंडन मॅकलमनंतर शतक झळकावणारा तो केवळ दुसरा फलंदाज बनला. मॅकलमने आयपीएल इतिहासातील पहिल्याच सामन्यात 158 धाची खेळी केली होती. शतकानंतर तो फार काळ टिकला नाही व 104 धावा करत बाद झाला.
मध्यप्रदेशसाठी देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या अय्यरने 2021 मध्ये केकेआरसाठी पदार्पण केले होते. त्याने त्या हंगामात शानदार फलंदाजी करत भारतीय संघात देखील जागा मिळवली होती. त्यानंतर झालेल्या दुखापतीमुळे मागील हंगामात तो फारसा प्रभावीत करू शकला नाही. परंतु या हंगामात त्याने आत्तापर्यंत सर्वाधिक धावा काढत ऑरेंज कॅप आपल्या नावे केली आहे.
(KKR Batter Venkatesh Iyer Hits Century Against Mumbai Indians At Wankhede Stadium Only Second After Brendon McCullum)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘चॅच ऑफ द टूर्नामेंट’साठी राहुलची दावेदारी! पंजाबच्या फलंदाजाला तंबूत धाडण्यासाठी मोरली मोठी डाईव्ह
सेंट्रेल कॅन्ट्रॅक्ट नसले तरीही बीसीसीआय ‘या’ खेळाडूवर खर्च करणार, शस्त्रक्रियेसाठी आरसीबीचा फलंदाज इंग्लडला जाणार