आयपीएल 2023 मध्ये यशस्वी जयस्वाल वादळी फॉर्ममध्ये दिसला आहे. हाच फॉर्म त्याने गुरुवारी (11 मे) कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धही कायम ठेवला. कोलकाताच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर राजस्थान रॉयल्सने केकेआरला 9 विकेट्सने पराभूत करत स्पर्धेतील आपले आव्हान राखले. त्याचवेळी सामन्याच्या अखेरच्या क्षणांमध्ये अशी एक घटना घडली, ज्यामुळे केकेआरचा युवा फिरकीपटू सुयश शर्मा सर्वांच्या निशाणावर आला आहे.
राजस्थान तेराव्या षटकातच विजयाच्या नजीक पोहोचली होती. तेराव्या षटकातील शेवटच्या चेंडूवर संजू सॅमसन स्ट्राईकवर होता. विजयासाठी राजस्थानला 3 धावा हव्या होत्या. सोबतच सॅमसनला अर्धशतकासाठी फक्त 2 धावा हव्या होत्या. तर, नॉन स्ट्राइकवर असलेल्या जयस्वाल याला शतकासाठी सहा धावांची गरज होती. त्यावेळी सुयश शर्माने अत्यंत लाजिरवाणी कृती केली.
त्याने जाणूनबुजून हा चेंडू डाव्या यष्टी बाहेर टाकण्याचा प्रयत्न केला. जेणेकरून चेंडू वाईड जाऊन बाईजच्या दोन धावा राजस्थानला मिळाल्या असत्या व राजस्थान विजयी झाली असती. मात्र, संजू सॅमसनने समय सूचकता दाखवत, पायाने चेंडू अडवला. पुढच्या षटकात जयस वाल्याला षटकार मारता आला नसला तरी त्याने चौकार मारत संघाला विजयी केले.
Sanju Samson was batting at 48*
Jaiswal was at 94*Very bad of Suyash Sharma to not care about both batsman's milestones.
Actually it's all KKR fault.. they should have scored atleast 8 more runs.
— Amit. (@iOnlyAJ) May 11, 2023
शर्मा याच्या या कृतीनंतर अनेकांनी सोशल मीडियावर त्याच्यावर टीका केली. माजी सलामीवीर आकाश चोप्रा यांनी देखील हे चुकीचे असल्याचे म्हटले.
Trying to bowl a wide to prevent Yashasvi from getting to his 100….poor taste IMHO.
— Aakash Chopra (@cricketaakash) May 11, 2023
राजस्थानने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीला आलेला यजमान कोलकाता नाईट रायडर्स संघ 20 षटकांमध्ये 8 बाद 149 धावा करू शकला. विजयासाठी राजस्थानला 150 धावांचे आव्हान मिळाले होते, जे त्यांनी अवघ्या 13.1 षटकात गाठले. जयस्वालने 47 चेंडूत नाबाद 98 धावा केल्या, तर सॅमसनने 29 चेंडूत नाबाद 48 धावा कुटल्या.
(KKR Bowler Suyash Sharma Trying Bowl Wide On His Last Ball To Avoid Yashasvi Century)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
लय भारी! ऑस्कर विजेत्या The Elephant Whisperers टीमला भेटला धोनी, गिफ्ट म्हणून दिली ‘ही’ खास वस्तू
‘त्यांनी मला फोन करून…’, खराब फॉर्ममध्ये असताना टीका करणाऱ्यांबद्दल नितीश राणाचा धक्कादायक खुलासा