चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडिअमवर आयपीएल 2023 स्पर्धेचा 61वा सामना चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स संघात खेळला गेला. रविवारी (दि. 14 मे) पार पडलेल्या या सामन्यात कोलकाता संघाने चेन्नईला 6 गडी राखून पराभूत केले. या सामन्यात विजय मिळवला असला तरी, केकेआरचा कर्णधार नितिश राणा व संपूर्ण संघावर कारवाई करण्यात आली.
हा सामना केकेआर संघासाठी अत्यंत महत्त्वाचा होता. त्यांच्या गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी करत सीएसकेला अवघ्या 144 धावांवर रोखले. मात्र, निर्धारित वेळेत षटके पूर्ण न केल्याने केकेआरचा कर्णधार नितेश राणा याला 24 लाखांचा दंड ठोठावला गेला. तर, इतर खेळाडूंना प्रत्येकी 6 लाख व सामना शुल्काच्या 25% रकमेची कपात केली गेली.
या मुद्द्यावरून नितीश राणा व पंचांची चांगलीच खडाजंगी झाली होती. चेन्नईच्या डावातील 19 वे षटक सुरू असताना पंचांनी एक चेंडू वाईड दिला. त्यावर राणाने कोणताही रिव्ह्यू घेतला नाही. मात्र, पंचांना वाटले त्याने रिव्ह्यू मागितला आहे म्हणून ते तिसऱ्या पंचांकडे गेले. वेळ वाया गेला व अखेरच्या षटकात केकेआरला नाईलाजाने 30 यार्ड बाहेर केवळ चार क्षेत्ररक्षकांसह खेळावे लागले. यामध्ये पंचांची चूक असल्याचे राणाच्या हावभावावरून स्पष्ट होत होते.
या सामन्याचा विचार केल्यास धोनी याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. मात्र, केकेआरच्या गोलंदाजांनी त्याचा हा निर्णय काहीसा चुकीचा ठरवला. केकेआरच्या सर्वच गोलंदाजांनी कसून मारा करत चेन्नईला 144 पर्यंत रोखले. शिवम दुबेने सर्वाधिक 48 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना केकेआरची सुरुवात खराब झाली. पहिल्या पाच षटकात त्यांनी तीन बळी गमावले होते. मात्र, नितीश राणा व रिंकू सिंग यांनी अर्धशतके झळकावत संघाला सहा गडी राखून विजय मिळवून दिला. चेन्नईचा अखेरचा साखळी सामना दिल्ली येथे दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध होईल.
(KKR Captain Nitish Rana And Team Fined For Slow Over Rate Against Chennai Super Kings)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या–
VIDEO:..आणि गावसकरांनी शर्टवर घेतला धोनीचा ऑटोग्राफ, पाहा आयपीएलमधील सर्वात भावनिक क्षण
धोनीने चेन्नईत खेळला अखेरचा सामना? चेपॉकवर फेरी मारत चाहत्यांना म्हणाला, “थॅन्कू”, पाहा व्हिडिओ