सध्या क्रिकेटजगतात विविध व्यावसायिक टी२० लीग नव्याने सुरू होत आहेत. पुढील वर्षाच्या सुरुवातीला दक्षिण आफ्रिकेत एक नवी कोरी टी२० लीग खेळली जाणार आहे. त्याचबरोबर संयुक्त अरब अमिरातीतही (युएई) त्याचवेळी टी२० लीग सुरू होईल. युएईतील या लीगसाठी आत्तापासूनच अनेक बड्या खेळाडूंशी बातचीत करण्यास संघाच्या संघमालकांनी सुरुवात केली आहे. आता आयपीएलमधील कोलकाता नाईट रायडर्स संघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी वेंकी मैसूर यांनी एक महत्त्वाचे विधान केले आहे.
मैसूर यांनी नुकतेच आयपीएल, आयपीएलमधील खेळाडू, त्यांचे करार व विदेशी लीग याबाबत प्रतिक्रिया दिल्या. मैसूर म्हणाले,
“आम्ही खेळाडूंशी वार्षिक करार करण्यास उत्सुक आहोत. अनेक संघ याबाबत विचार करत आहेत. भविष्यात असे झाल्यास हा एक उत्कृष्ट निर्णय ठरू शकतो. आम्ही सर्व लीग एक सामायिक व्यासपीठ म्हणून पाहत आहोत. आम्ही आमचा ब्रँड आणि फॅन बेस वाढवण्याचा प्रयत्न करतोय. जगातील अनेक युवा खेळाडूंना यातून संधी देण्यात येऊ शकते. यातून तुम्ही एक मोठा बिझनेसही उभा करू शकता.”
सध्या नाईट रायडर्स या एकाच ब्रँडचे जगभरात चार संघ आहेत. आयपीएलमधील कोलकाता नाईट रायडर्स व्यतिरिक्त युएईतील लीगमध्ये अबुधाबी, कॅरेबियन प्रीमियर लीगमधील ट्रिनबॅंगो तसेच अमेरिकेतील लॉस एंजेलिस या फ्रॅंचाईजी त्यांच्या मालकीच्या आहेत.
याचबरोबर मैसूर यांनी भारतीय खेळाडूंच्या इतर लीगमधील प्रवेशाबाबत एक महत्त्वाचे विधान केले. बीसीसीआय लवकरच आपल्या खेळाडूंना इतर लीगमध्ये खेळण्याची परवानगी देऊ शकते असे त्यांनी म्हटले. युएई व दक्षिण आफ्रिकेतील लीगमध्ये आयपीएलमधील संघमालकांनी संघ विकत घेतले आहेत. या सर्व संघमालकांनी विनंती केल्यास लवकरच इतर लीगमध्ये भारतीय खेळाडू दिसण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
कॅप्टन रोहित होणार आणखीनच हीट! दोन वेळच्या विश्वविजेत्या कर्णधाराला टाकणार मागे
माजी क्रिकेटरचा भारताच्या संघ निवडकर्त्यालाच दम! म्हणाला, ‘टी२० विश्वचषकासाठी योग्य टीम निवड’
रविंद्र जडेजामुळे ‘या’ खेळाडूची कारकीर्द संपण्याच्या मार्गावर, धोनीसारखा आहे फिनिशर