आयपीएलमध्ये प्रत्येक खेळाडूला वाटतं की, असा एक तरी खेळाडू आपल्या संघात असावा ज्याच्यामुळे संघ विजेतेपद पटकावेल. काही वेळा संघांना ही संधीही मिळते. असेच काहीसं कोलकाता नाईट रायडर्स संघाचा माजी कर्णधार गौतम गंभीरला वाटते.
अनेक वर्षांपर्यंत केकेआरचे नेतृत्व करणारा गंभीर म्हणाला की, जर आयपीएल फ्रंचायझी संघ केकेआरने (Kolkata Knight Riders) वेस्ट इंडीजचा धडाकेबाज फलंदाज आंद्रे रसेलला (Andre Russell) सुरुवातीलाच विकत घेतले असते, तर केकेआरने निश्चितच अनेक विजेतेपद जिंकले असते.
गंभीरने एका चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, “विचार करा की रसेलला ५० लाख रुपयांमध्ये केकेआरने विकत घेतले आणि पवन नेगीला दिल्ली डेअरडेविल्स (दिल्ली कॅपिटल्स) ८ कोटी रुपयांना विकत घेतले. ज्यावेळी मी केकेआरचे नेतृत्व करत होतो, तेव्हा रसेल ती ७ वर्षे केकेआरमध्ये असायला पाहिजे होता. आम्ही निश्चितच २ पेक्षा अधिक विजेतेपद जिंकले असते.”
केकेआरने २ वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकाविले आहेत. केकेआरने २०१२मध्ये चेन्नई सुपर किंग्स आणि २०१४ मध्ये किंग्स इलेव्हन पंजाबला (Kings XI Punjab) पराभूत करत आयपीएलचे विजेतेपद पटकाविले होते.
रसेलने २०१२मध्ये दिल्ली डेअरडेविल्स संघात पदार्पण केले होते. परंतु दुखापतीमुळे तो अधिक सामने खेळू शकला नाही. २०१४ मोसमापूर्वी कोलकाता संघाने त्याला आपल्या संघात समाविष्ट केले होते.
ट्रेंडिंग घडामोडी-
-रात्री दोन वाजता त्या क्रिकेटपटूने सांगितलं, मला आहेत कोरोनाची लक्षणं
-आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनी या कारणासाठी मानले युवराजचे धन्यवाद
-आयपीएल झाली नाही, पण हा खेळाडू ठरला आयपीएलमधील बेस्ट कॅप्टन