---Advertisement---

गौतम गंभीरसमोर रडला केकेआरचा चाहता, हात जोडून केलं खास आवाहन; हा 50 सेकंदाचा व्हिडिओ तुम्हालाही रडवेल

---Advertisement---

गौतम गंभीर कोलकाता नाईट रायडर्समध्ये सामील झाल्यापासून संघानं आपल्या कामगिरीनं सर्वांनाच आश्चर्यचकित केलं आहे. आयपीएल 2024 सुरू होण्यापूर्वी गंभीर केकेआरसोबत मार्गदर्शक म्हणून सामील झाला. गौतम गंभीर कर्णधार असताना कोलकाता संघ 2012 आणि 2014 मध्ये दोनदा चॅम्पियन बनला होता. गंभीर 2018 पासून केकेआरपासून दूर होता. परंतु आता तो संघासोबत पुन्हा जोडल्या गेल्यानंतर केकेआरचं नशीब पालटलं आहे.

आयपीएल 2024 मध्ये कोलकाताचा संघ प्ले ऑफमध्ये पोहोचण्याच्या अगदी समीप आहे. दरम्यान, गौतम गंभीरसोबत एका चाहत्यानं संवाद साधला, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये चाहता गंभीरला फ्रँचायझीपासून दूर न जाण्याचं आवाहन करताना दिसत आहे. कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या अधिकृत सोशल मीडिया अकऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

व्हिडोओमध्ये हा चाहता गौतम गंभीरला म्हणतो की, “मी तुझ्या सर्वात मोठ्या चाहत्यांपैकी एक आहे. मला एवढंच सांगायचं आहे की, आम्हाला सोडून जाऊ नको. तू गेल्यावर आम्ही किती दुःखी होतो हे सांगू शकत नाही. मला तुझ्यासाठी एक बंगाली गाणं गायचं आहे.” यानंतर हा चाहता गंभीरसाठी बंगाली गीताची एक ओळ गातो,  ज्याचा अर्थ आहे, “मी तुला माझ्याजवळ ठेवीन, मी तुला कधीही जाऊ देणार नाही, ही आम्हा प्रत्येकाची भावना आहे.” तुम्ही हा व्हिडिओ येथे पाहू शकता.

 

गौतम गंभीरनं 2018 मध्ये दिल्ली कॅपिटल्समध्ये जाण्यासाठी केकेआरची साथ सोडली होती. त्यानंतर त्यानं निवृत्ती घेतली. 2022 मध्ये तो लखनऊ सुपर जायंट्ससोबत मार्गदर्शक म्हणून जोडला गेला. या हंगामाच्या सुरुवातीला तो पुन्हा एकदा केकेआरमध्ये वापस आला. गौतम गंभीर केकेआरमध्ये आल्यापासून संघ जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. कोलकाता संघानं आतापर्यंत खेळलेल्या 11 सामन्यांपैकी 8 सामने जिंकले असून, ते गुणतालिकेत अव्वल स्थानी आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

गोळ्या झाडल्या…दगडं उचलले…आर्मीप्रमाणे ट्रेनिंग करूनही आयर्लंडकडून हारले; पाकिस्तानची क्रिकेट टीम सोशल मीडियावर खूप ट्रोल

ब्रेकिंग बातमी! दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार रिषभ पंतचं निलंबन! बीसीसीआयची मोठी कारवाई

‘थाला’ला भेटायला चाहता सरळ मैदानात! ‘माही’च्या पाया पडला अन्….हा व्हायरल व्हिडिओ नक्की पाहाच

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---