इंडियन प्रीमियर लीग 2024 साठी श्रीलंका संघाचा वेगवान गोलंदाज दुष्मंथा चमीरा याला संधी मिळाली आहे. कोलकाता नाईट रायडर्स संघाने चमीरा याला 17व्या हंगामासाठी आपल्या स्कॉडमध्ये सामील केले आहे. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज गस एटकिंसन याच्या जागी चमीरा याला आगामी आयपीएल हंगामात संधी दिली गेली आहे.
इंडियन प्रीमियर लीग 2024 हंगामाची सुरुवात मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होऊ शकते. कोलकाता नाईट रायडर्सने श्रीलंकन खेळाडूला 50 लाख रुपये खर्च करून दुष्मंथा चमीरा (Dushmantha Chamira) ताफ्यात सामील केले आहे. इंग्लिश गोलंदाज गस एटकिंसन याला एक कोटी रुपये देऊन केकेआरने संघात घेतले होते. पण ताज्या माहितीनुसार 26 वर्षीय एटकिंसन आगामी आयपीएल हंगामात खेळणार नाहीये. यात कारणास्तव चमीराला संधी मिळाली.
दुष्मंथा चमीरा याने 2022 साली आयपीएल पदार्पण केले होते. मागच्या वर्षी म्हणजेच आयपीएल 2023 मध्ये चमीरा याला खरेदीदार मिळाला नाही. आपली गती, स्विंग आणि सीम या गोष्टींसाठी चमीरा ओळखला जातो. इंडियन प्रीमियर लीगने चमीरा केकेारमध्ये सामील झाल्याची अधिकृत माहिती दिली आहे. आयपीएलच्या माहितीनुसार, “चमीरा 50 लाख रुपयांमध्ये केकेआर संघात सामील झाला. तो 2018 आणि 2021 साली अनुक्रमे राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा भाग होता. 2022 हंगामात त्याने लखनऊ सुपर जायंट्स संखाचे प्रतिनिधित्व केले होते. या हंगामात त्याने 12 सामन्यात 9 विकेट्स घेतल्या होत्या.”
32 वर्षी दुष्मंथा चमीरा मागच्या वर्षी दुखापत झाल्यामुळे काही काळ क्रिकेट खेळू शकला नव्हता. त्याने नुकतेच यूएईमधील आयएल20 लीगमध्येही भाग घेतला होता. 9 फेब्रुवारी रोजी त्याने श्रीलंकन संघाकडून अफगाणिस्तानविरुद्ध वनडे सामना खेळला. या सामन्यात त्याने 2 विकेट्स नावावर केल्या. 2015 साली आंतरराष्ट्रीय पदार्पण करणारा हा वेगवान गोलंदाज 2021 नंतर एकही कसोटी सामना खेळला नाहीये. (KKR has added Sri Lankan pacer Dushmantha Chameera to the squad for IPL 2024.)
महत्वाच्या बातम्या –
IND vs ENG : भारताला आता ‘या’ दिग्गजाची कमी जाणवणार नाही! जयस्वालविषयी माजी कर्णधाराचे मोठे विधान
नको रोहित नको! कर्णधाराच्या ‘या’ निर्णयावर चाहते नाराज, स्टॅन्डमधील व्हिडिओ होतोय व्हायरल