---Advertisement---

प्लेऑफच्या शर्यतीमधील केकेआर, वरुण चक्रवर्तीमुळे अडचणीत! BCCI च्या चौकशीला सामोरे जावे लागण्याची शक्यता

On: सोमवार, मे 18, 2026 4:22 PM
---Advertisement---

आयपीएल २०२६ मध्ये ६० सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात शनिवारी (१६ मे) खेळला गेला. ईडन गार्डन्सवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात यजमानांनी विजयी कामगिरी करत जीटीचा रथ रोखला. हा सामना केकेआरने २९ धावांनी जिंकला आणि त्यांच्या प्लेऑफच्या आशा कायम राहिल्या, मात्र त्यांना बीसीसीआयच्या चौकशीला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. त्यामागचे कारण वरुण चक्रवर्ती आहे.

जीटीविरुद्ध केकेआरच्या महत्त्वपूर्ण विजयात आपले सर्व षटके टाकणाऱ्या वरुणवर सर्वांचे लक्ष आहे. दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या (८ मे) सामन्यावेळी त्याला दुखापत झाल्याने त्याला मैदान सोडावे लागले होते. यामुळे तो नंतरच्या सामन्यासही मुकला होता, जो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध होता. नंतर झालेल्या स्कॅनमध्ये त्याला हेअरलाईन फ्रॅक्चर झाल्याचे कळाले आणि त्यामुळेच तो आरसीबी विरुद्धच्या सामन्याला मुकला होता.

वरुण दुखापतग्रस्त असूनसुद्धा केकेआरने त्याला जीटीविरुद्ध खेळवले आणि आता या गोष्टीकडेच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) लक्ष वेधले. तो भारताच्या टी२० संघाचा करारबद्ध खेळाडू आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार, शनिवारी घडलेल्या या प्रकाराची बीसीसीआय दखल घेऊ शकते आणि ते याची चौकशीही करू शकतात.

मिळालेल्या माहितीनुसार, अहवालात सांगितले आहे की केकेआरचे फिजिओ भारतीय संघाच्या फिजिओच्या संपर्कात आहेत. तसेच वरुणच्या दुखापतीचे व्यवस्थापन कसे करायचे याबद्दल बीसीसीआयकडून स्पष्ट सूचना देण्यात आली आहे. व्यवस्थापनाकडून बीसीसीआयचे फिजिओ वरुणच्या फिटनेसबाबत चौकशी करू शकतात.

वरुणने नुकत्याच झालेल्या आयसीसी टी२० विश्वचषक २०२६ मध्ये भारताच्या विजेतेपदामध्ये मोठी भुमिका निभावली होती. तसेच बीसीसीआयने आयपीएलनंतर आयर्लंड आणि इंग्लंड दौरा आयोजित केला असून संघाचे वेळापत्रत व्यस्त आहे.

वरूणसाठी आयपीएलचा हा हंगाम म्हणावा तसा गेला नाही. त्याने ९ सामन्यांमध्ये १० विकेट्स घेतल्या आहेत. केकेआर गुणतालिकेत आठव्या स्थानी असून त्यांचे पुढील सामने २० मे रोजी मुंबई इंडियन्सविरुद्ध आणि २४ मे रोजी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---