शारजाहमध्ये मंगळवारी (३ नोव्हेंबर) मुंबई आणि हैदराबाद संघामध्ये साखळी फेरीतील अंतिम सामना झाला. या सामन्यात मुंबईने प्रथम फलंदाजी करताना ८ विकेट्सच्या नुकसानावर १४९ धावा केल्या. मुंबईच्या या १५० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादच्या केवळ दोन मावळ्यांनी पूर्ण संघाची खिंड लढवली. आणि १७.१ षटकातच सामना खिशात घातला.
त्यामुळे हैदराबादने हंगामातील ७वा विजय नोंदवत १४ गुणांसह गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर उडी घेतली. तसेच प्लेऑफमधील चौथ्या स्थानावरही ताबा मिळवला. परंतु या विजयासह कोलकाता नाईट रायडर्सच्या स्वप्नांचा चुराडा झाला आहे. यानंतर मात्र नेटकऱ्यांनी कोलकाताला ट्रोल करण्याची संधी सोडलेली नाही.
ट्विटरवर संघातील खेळाडूंचे घरी जातानाचे, संघमालक शाहरुख खानसोबत मुंबई-हैदराबादचा सामना पाहतानाचे, इत्यादी मिम्स जोरदार व्हायरल होऊ लागले आहेत. एका ट्विटर वापरकर्त्याने तर कोलकाताचे खेळाडू मुंबईला ‘चिटिंग करता है तू,’ असे म्हणातानाचा मिम शेअर केला आहे.
अशी होती चौथ्या स्थानासाठीची शर्यत
मुंबई विरुद्ध हैदराबाद सामन्यापुर्वी प्ले ऑफमध्ये स्थान मिळवणारे ३ संघ निश्चित झाले होते. मुंबई, दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर हेच ते तीन संघ आहेत. तर चौथा संघ कोणता असेल हे मुंबई विरुद्ध हैदराबाद संघातील सामन्याद्वारे ठरणार होते. चौथ्या स्थानासाठी हैदराबादसह कोलकाता संघ शर्यतीत होता. जर हैदराबादने मुंबईला पराभूत केले, तर त्यांचा नेट रनरेट कोलकातापेक्षा अधिक होणार. त्यामुळे ते चौथ्या स्थानावर येतील. मात्र, त्यांचा या सामन्यात पराभव झाला, तर कोलकाता प्ले ऑफमध्ये स्थान मिळवेल. अशी चौथ्या स्थानासाठीची समीकरणे होती.
मुंबई-हैदराबाद सामन्याची आकडेवारी
या सामन्यात मुंबईकडून प्रथम फलंदाजी करताना कायरन पोलार्डने सर्वाधिक ४१ धावा केल्या होत्या. तर सूर्यकुमार यादव २९ चेंडूत ३६ धावा, इशान किशन ३० चेंडूत ३३ धावा, क्विंटन डी कॉक १३ चेंडूत २५ धावा करु शकले होते. त्यांच्याव्यतिरिक्त इतर कोणत्याही फलंदाजाला हैदराबादच्या गोलंदाजांनी १० धावाही करु दिल्या नाहीत. त्यामुळे २० षटकात मुंबईने हैदराबादला १४९ धावांचे आव्हान दिले.
https://twitter.com/oii_ammy/status/1323640071413620737?s=20
https://twitter.com/agashe_brajesh/status/1323677857000747008?s=20
https://twitter.com/bakchoddd/status/1323577869109358597?s=20
#SRHvMI #kkr #srh #mi #IPL2020 pic.twitter.com/CtrBIONZKJ
— Akashhhh (@whateverakash) November 3, 2020
KKR rn. #SRHvsMI pic.twitter.com/jHD2uNFNZK
— Mr. Khurafati ❁ (@elia_official) November 3, 2020
#MIvsSRH#KKR after seeing MI's low target at Sharjah pic.twitter.com/9NcyAzAKjL
— Shivani (@meme_ki_diwani) November 3, 2020
#KKR to fans
In (Dc SRH MI) sb ne mil ke mujhko chut*ya banaya hai pic.twitter.com/TOidjez18j— ShaCasm (@MehdiShadan) November 3, 2020
#KKR fans watching #MIvSRH : pic.twitter.com/M6krWXj4od
— R I S H I (@Rishiicasm) November 3, 2020
Nobody: #KKR
KKR TO MI: pic.twitter.com/WDYx93mDyx— Krsh_345 (@KrishKunwar345) November 3, 2020
https://twitter.com/Swamy_Official/status/1323682214597414912?s=20
या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादचा कर्णधार डेविड वॉर्नर आणि यष्टीरक्षक फलंदाज वृद्धिमान साहा यांच्या धमाकेदार फलंदाजी केली. वॉर्नरने या रोमहर्षक सामन्यात ५८ चेंडूत ८५ धावांची नाबाद खेळी केली. तर साहाने ४५ चेंडूत नाबाद ५८ धावा केल्या. यासह हैदराबादने ११ चेंडू राखुन मुंबईचा विजयरथ रोखला.
महत्त्वाच्या बातम्या-
मुंबईला पराभवाची धूळ चारत हैदराबाद प्लेऑफमध्ये दाखल, वॉर्नर आणि साहा यांची अर्धशतके
ये गड्डी नही रुकेगी! गेल- पोलार्डला मागे टाकत इशान किशनचा मोठा पराक्रम
सूर्यकुमार यादवच्या ‘या’ पराक्रमाने तरी निवड समितीचे डोळे उघडतील का?
ट्रेंडिंग लेख-
‘हे’ ३ संघ कधीही राहिले नाही गुणतालिकेत शेवटच्या स्थानी, तर दिल्ली संघ मात्र…
IPL 2020 : कोलकाताच्या ‘या’ पाच खेळाडूंपुढे राजस्थानने टेकले गुडघे
वाढदिवस विशेष: ऑस्ट्रेलियाचा दिग्गज गोलंदाज मिशेल जॉन्सनबद्दल या खास गोष्टी माहित आहेत का?