बुधवारी (दि. 26 एप्रिल) आयपीएल 2023 स्पर्धेतील 36वा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात पार पडला. बेंगलोरच्या एम चिन्नास्वामी स्टेडिअमवर पार पडलेला हा सामना कोलकाता संघाने 21 धावांनी जिंकला. हा हंगामातील तिसरा विजय होता. केकेआरच्या विजयात सलामीवीर जेसन रॉय याचा सिंहाचा वाटा राहिला. मात्र, सामन्यानंतर त्याला सामन्यात केलेल्या एका कृतीमुळे दंडाला सामोरे जावे लागले.
केकेआरचा कर्णधार नितिश राणा याने नाणेफेक गमावल्याने केकेआरला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले गेले. अनुभवी जेसन रॉय व युवा एन जगदीशन यांनी ही संधी साधली. दोघांनी 9.2 षटकात 83 धावांची सलामी दिली. हंगामातील तिसरा सामना खेळत असलेल्या रॉयने पुन्हा एकदा आक्रमक फलंदाजीचा नमुना सादर केला. त्याने अवघ्या 22 चेंडूंवर आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने चार चौकार व पाच षटकारांच्या मदतीने 29 चेंडूवर 56 धावांची आणखी एक जबरदस्त खेळी केली.
रॉय ज्यावेळी विजयकुमार वैशाक याच्या चेंडूवर त्रिफळाचीत झाला त्यावेळी त्यांनी आपली बॅट फेकत राग व्यक्त केला. आयपीएल आचारसंहितेच्या लेव्हल 2.2 चे उल्लंघन केल्याप्रकरणी त्याची 10 टक्के मॅच फी कपात करण्यात आली. त्याने देखील आपला गुन्हा मान्य केला आहे.
या सामन्याचा विचार केल्यास विराट कोहलीने नाणेफेक जिंकून केकेआरला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. केकेआरला जेसन रॉय व जगदीसन यांनी 83 धावांची सलामी दिली. रॉयने सलग दुसऱ्या सामन्यात अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर कर्णधार राणा, व्यंकटेश अय्यर व रिंकू सिंग यांनी दिलेला उपयुक्त योगदानाच्या जोरावर केकेआरने 200 धावा उभ्या केल्या. या धावांचा पाठलाग करताना आरसीबीला पावर प्लेमध्ये तीन झटके बसले. कर्णधार विराट कोहलीने अर्धशतक करत झुंज दिली. त्यानंतर खालच्या फळीतील फलंदाज अपेक्षित कामगिरी करू नसल्याने आरसीबीला पराभव पत्करावा लागला. केकेआरसाठी वरूण चक्रवर्तीने सर्वाधिक तीन बळी मिळवले.
(Kkr Opener Jason Roy Fined 10 Percent match fees for breaching IPL code of conduct)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सरफराजचं नशीब फळफळलं! WTC फायनलसाठी टीम इंडियात जागा, द्विशतक ठोकणाऱ्या ‘या’ 2 खेळाडूंचीही चांदी
डब्ल्यूटीसी फायनलसाठी गावसकरांनी निवडली भारताचा प्लेइंग इलेव्हन! 5 फलंदाज आणि 3 गोलंदाजांना संधी