इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) कोरोना व्हायरस या जागतिक महामारीने प्रवेश केला आहे. आयपीएल २०२१ चा पहिला टप्पा सुरळितपणे पार पडल्यानंतर दुसऱ्या टप्प्याच्या सुरुवातीलाच कोरोनाचे सावट पसरताना दिसत आहे. सोमवारी (३ मे) अहमदाबाद येथे कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात आयपीएल २०२१ चा तिसावा सामना होणार होता. परंतु कोलकाता संघाचे काही खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने हा सामान पुढे ढकलण्यात आला आहे.
यानंतर कोलकाताच्या ताफ्यात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशात कोलकाताचा संघमालक आणि प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याने स्वत: संघाचे वातावरण चांगले करण्याचा प्रयत्न केला असल्याचे समजत आहे.
सोमवार रोजी कोलकाता संघाचे वरुण चक्रवर्ती आणि संदीप वॉरियर यांना कोरोनाचे संक्रमण झाल्याचे वृत्त पुढे आले होते. हे क्रिकेटपटू सिटी स्कॅनसाठी जैव सुरक्षित वातावरणाबाहेर गेले होते. यादरम्यान त्यांना कोरोनाची लागण झाली असल्याचे म्हटले जात आहे. यामुळे कोलकाता संघातील ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि न्यूझीलंड अशा परदेशी क्रिकेटपटूंमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
भारतातील कोरोनाचा वाढता प्रकोप पाहता ऑस्ट्रेलियासह बऱ्यात देशांनी भारतीयांसाठी प्रवासबंदी घातली आहे. यामुळे आयपीएल २०२१ मध्ये सहभागी असलेल्या परदेशी खेळाडूंना आपण भारतात अडकून बसल्यासारखे वाटत आहे. अशात कठोर जैव सुरक्षित वातावरणानंतरही खेळाडूंना कोरोनाची बाधा होत असल्याचे पाहून त्यांच्या मनातील भिती अजून जास्तच वाढली आहे.
परंतु कोलकाता संघावर कोरोनाचे संकट ओढावले असल्याचे कळाल्यानंतर किंग खानने संघातील खेळाडूंशी संवाद साधला असल्याचे समजत आहे. या कठीण परिस्थितीत खेळाडूंना धीर देत त्यांचे मनोबल वाढवण्याचे त्याने काम केले आहे. याबरोबरच कोलकाता संघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी वेंकी मैसूर आणि जय मेहता यांनीही खेळाडूंशी संवाद साधल्याचे समजते. त्यांच्या या कृतीमुळे कोलकाता संघातील खेळाडूंचे त्याचे आभार मानले आहेत.
Thank you so much @iamsrk , @VenkyMysore and jay mehta sir , for comforting us and giving us the confidence that as owners and as a franchise you have our backs????, makes me so happy to be a part of such a team????
— Sheldon Jackson (@ShelJackson27) May 3, 2021
कोलकाचा संघाचा क्रिकेटपटू शेल्डन जॅक्सन याने ट्विट करत शाहरुखचे आभार मानले आहे. त्याने लिहिले आहे की, ‘शाहरुख खान, वेंकी मैसूर आणि जय मेहता सर तुमचे खूप आभार. तुम्ही एका संघ मालकाच्या रुपात कठीण परिस्थितीत आमचे मनोबल वाढवले. तुम्ही आमचा आधारस्तंभ आहात. मी अशा एका संघाचा भाग असल्याचा मला आनंद आहे.’
Thank you @iamsrk @KKRiders @VenkyMysore for being there for all of us here in the #Kkrrfamily ????????
— Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) May 3, 2021
याबरोबरच नव्याने कोलकाता संघात सहभागी झालेल्या फिरकीपटू हरभजन सिंगनेही शाहरुखचे आभार मानले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
IPL 2021 : बाद फेरीत स्थान मिळवण्याची चुरस वाढली, पाहा कोणते संघ पक्की करणार आपली जागा
पृथ्वी शॉच्या अवघड जागी लागला चेंडू, मग फलंदाजाने भर मैदानातचं केलं असं काही; पाहून व्हाल लोटपोट






