न्यूझीलंडचा दिग्गज वेगवान गोलंदाज टिम साउदी आयपीएल २०२२ हंगाम सुरू होण्यापूर्वी लग्नबंधनात अडकला आहे. साउदीने त्याची प्रेयसी ब्राया फाही सोबत लग्न केले आहे. आयपीएल २०२२ हंगामाची सुरुवात २६ मार्चपासून होणार आहे. साउदीने स्वतःच्या अधिकृत इंस्टाग्राम खात्यावरून पत्नीसोबतचा लग्नातील फोटो अपलोड केला आहे.
टिम साउदी (Tim Southee) आणि ब्राया फाही (brya fahy) या दोघांनीही लग्नासाठी घातले जाणारे पारंपारिक पद्धतीचे कपडे परिधान केले आहेत. साउदीने काळ्या रंगाचा कोट घातला आहे, तर ब्राया पांढऱ्या गाउनमध्ये दिसत आहे. अधिकृत इंस्टाग्राम खात्यावरून शेअर केलेल्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये साउदीने ह्रदयाची एक इमोजीही टाकत ‘कायमची सोबत’ (Forever) असे लिहिले आहे. साउदीला लग्नाच्या आधी दोन मुली आहेत. त्याच्या मोठ्या मुलीचा २०१७ आणि लहान मुलीचा जन्म २०१९ मध्ये झाला होता आणि आता अखेर तो लग्नबंधनात अडकला आहे.
३३ वर्षीय वेगवान गोलंदाज साउदी आयपीएलच्या आगामी हंगामात कोलकाता नाइट रायडर्सचे प्रतिनिधित्व करताना दिसणार आहे. आयपीएलच २०२२ साठी फेब्रुवारी महिन्यात घेतल्या गेलेल्या मेगा लिलावात (IPL 2022 Mega Auction) कोलकाता नाइट रायडर्सने साउदीला १ कोटी ५० लाख रुपयांमध्ये खरेदी केले. ही त्याची बेस प्राईस होती.
मागच्या आयपीएल हंगामातील दुसऱ्या टप्प्यात पॅट कमिन्स (Pat Cummins) उपलब्ध नसल्यामुळे त्याची जागा टीम साउदीने घेतली होती. दुसऱ्या टप्प्यात साउदीने ३ विकेट्स घेतल्या होत्या. केकेआर संघ मागच्या वर्षीच्या अंतिम सामन्यापर्यंत पोहोचला होता सीएसकेकडून संघाला पराभव पत्करावा लागला होता. आयपीएल २०२१ हंगामात केकेआर उपविजेता संघ ठरला होता.
साउदीचा आयपीएलमधील इतिहास पाहिला, तर तो अनेक संघांसाठी खेळला आहे. यापूर्वी तो आयपीएमधील चेन्नई सुपर किंग्ज (CSK), राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals), ५ वेळा विजेतेपद जिंकलेल्या मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (RCB) या संघांसाठी खेळला आहे. आतापर्यंत त्याने खेळलेल्या ४३ आयपीएल सामन्यांमध्ये ३१ विकेट्स घेतल्या आहेत. तसे पाहिले, तर आयपीएलपेक्षा आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये त्याचे प्रदर्शन अधिक चांगले दिसते. साउदी टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा दुसरा गोलंदाज आहे. तायने ९२ आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यांमध्ये १११ विकेट्स घेतल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या –
IPL 2022| सुरुवातीच्या षटकांमध्ये ‘हे’ पाच गोलंदाज प्रतिस्पर्धी संघांसाठी पडू शकतात महागात
पंजाब-लखनऊचे १६ कोटींचे खेळाडू चमकले; एकाची फलंदाजीत, तर दुसऱ्याची गोलंदाजीत कमाल
‘भारती विद्यापीठ आयएमईडी’च्या ‘स्पोर्ट्स मीट २०२२’ चे उद्घाटन