आयपीएल 2024चा हंगामा केकेआरसाठी संस्मरणीय ठरला. आयपीएल 2024च्या फायनल सामन्यात (26 मे) कोलकाता नाईट रायडर्ससमोर सनरायझर्स हैदराबादचं आव्हान होतं. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. केकेआरनं हैदराबादवर 8 गडी राखून विजय मिळवला होता. प्रथम फलंदाजी करताना हैदराबादचा संघ 18.3 षटकांत 113 धावांवर ऑलआऊट झाला होता. केकेआरनं हे लक्ष्य अवघ्या 10.3 षटकांत 2 गडी गमावून गाठलं.
फायनलमध्ये ‘पॅट कमिन्स’च्या नेतृत्वाखालील सनरायझर्स हैदराबाद संघाला केकेआर कडून 8 विकेट्सनी लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. या सामन्यात हैदराबाद संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत 114 धावांचे सोपे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात केकेआर संघाने 2 गडी गमावून अवघ्या 10.3 षटकांत सामना आणि विजेतेपद पटकावले. संघाकडून व्यंकटेश अय्यरने 26 चेंडूत 52 धावांची नाबाद खेळी केली. तर रहमानउल्ला गुरबाजने 32 चेंडूत 39 धावा केल्या. हैदराबादकडून पॅट कमिन्स आणि शाहबाज अहमद यांनी 1-1 विकेट्स घेतली.
केकेआरने यापूर्वी 2012 आणि 2014 आयपीएल हंगामाच्या फायनलमध्ये प्रवेश केला होता आणि गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली दोन्ही वेळा विजेतेपद पटकावले होते. यानंतर, 2021च्या हंगामात, ते ओएन मॉर्गनच्या नेतृत्वाखाली फायनलमध्ये पोहोचले, त्यानंतर चेन्नई सुपर किंग्जकडून पराभूत झाले. केकेआर संघाचा हा चौथा फायनल सामना होता आणि त्यांनी तिसरे विजेतेपद पटकावले आहे.
या सामन्यात हैदराबाद संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो चुकीचा ठरला. संघाची सुरुवात खूपच खराब झाली आणि ते 18.3 षटकात 113 धावांवर सर्वबाद झाले. यासोबतच हैदराबाद संघानं एक लाजिरवाणा रेकाॅर्डही आपल्या नावावर केला. हैदराबादचा संघ आयपीएलच्या इतिहासातील कोणत्याही फायनल सामन्यात सर्वात कमी धावा करणारा संघ ठरला. त्यांनी चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) रेकाॅर्ड मोडला. याआधी चेन्नई संघानं 2013च्या फायनलमध्ये मुंबई इंडियन्सविरूद्ध 9 विकेट्सवर 125 धावा केल्या होत्या. हा सामना ईडन गार्डन्सवर झाला होता.
2024च्या फायनल सामन्यात केकेआर संघाचे गोलंदाज पूर्णपणे वरचढ दिसत होते. त्यांच्यासमोर हैदराबादचे फलंदाज ढेपाळले. कोलकाता विरूद्धच्या सामन्यात हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्स सर्वाधिक 24 धावा करू शकला आणि एडन मार्करमला 20 धावा करता आल्या.
त्याच्याशिवाय अन्य कोणत्याही फलंदाजाला 20 धावांचा देखील आकडा गाठता आला नाही. हेनरिक क्लासेननं 16 धावा केल्या. कोलकाताकडून वेगवान गोलंदाज आंद्रे रसेलने 3 विकेट्स घेतल्या. तर मिचेल स्टार्क आणि हर्षित राणा यांनी 2-2 विकेट्स घेतल्या. वैभव अरोरा, सुनील नारायण आणि वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी 1 विकेट्स घेतली होती.
2024च्या फायनल सामन्यातील दोन्ही संघांची प्लेइंग 11
सनरायझर्स हैदराबाद – ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, एडन मार्करम, नितीश रेड्डी, हेनरिक क्लासेन (यष्टीरक्षक), शाहबाज अहमद, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, जयदेव उनाडकट, टी नटराजन
इम्पॅक्ट प्लेअर्स – उमरान मलिक, ग्लेन फिलिप्स, मयंक मार्कंडे, अब्दुल समद, वॉशिंग्टन सुंदर
कोलकाता नाईट रायडर्स – रहमानउल्ला गुरबाज (यष्टीरक्षक), सुनील नारायण, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), रिंकू सिंह, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वैभव अरोरा, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती
इम्पॅक्ट प्लेअर्स – अनुकुल रॉय, मनीष पांडे, नितीश राणा, केएस भरत, शेरफाईन रदरफोर्ड
महत्त्वाच्या बातम्या-
शेवटच्या वेळी चॅम्पियन्स ट्राॅफीमध्ये कोणी मारली होती बाजी? भारत कितव्या स्थानी राहिला?
INDW vs WIW; हरमनप्रीत कौरने रचला इतिहास, शानदार खेळीने विश्वविक्रम मोडला
IND vs ENG; भारत दौऱ्यासाठी इंग्लंड संघाची घोषणा…! ‘या’ स्टार खेळाडूचे पुनरागमन