कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात आयपीएल २०२२मधील ४७वा सामना झाला. कोलकाताने ७ विकेट्स राखून हा सामना जिंकला. त्यांच्या विजयाचा नायक राहिला, रिंकू सिंग. २४ वर्षीय रिंकूने शेवटच्या षटकात धुव्वादार खेळी करत संघाला हंगामातील चौथा सामना जिंकून दिला. त्याच्या या मॅच विनिंग खेळीमुळे त्याला सामनावीर पुरस्कार देऊन गौरवण्यात (Rinku Singh Player Of The Match) आला.
आयपीएल कारकिर्दीतील १३वा सामना खेळणारा अलिगडचा रिंकू (Rinku Singh) जेव्हा फलंदाजीसाठी मैदानावर उतरला, तेव्हा संघाने ९२ धावांवर ३ विकेट्स गमावल्या होत्या. सामना रोमांचक स्थितीत होता. अशात राजस्थानच्या गोलंदाजांचे सगळे डावपेच चुकीचे ठरवत रिंकूने २३ चेंडूंमध्ये १ षटकार आणि ६ चौकारांच्या मदतीने नाबाद ४२ धावा फटकावल्या. तसेच त्याने चौथ्या विकेटसाठी नितीश राणासोबत मिळून ६६ धावांची अभेद्य भागीदारीही रचली.
ही रिकूंच्या आयपीएल कारकिर्दीतील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे. आपल्या या प्रशंसनीय खेळीनंतर रिंकू म्हणाला की, “अलिगडममधून अनेक क्रिकेटपटू आले आहेत, परंतु आयपीएल खेळणारा तेथील मी पहिलाच क्रिकेटपटू आहे.”
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
खडतर मार्गातून केला प्रवास
२४ वर्षीय रिंकूला (Rinku Singh Story) त्याच्या क्रिकेट कारकिर्दीदरम्यान बऱ्याच संघर्षाचा सामना करायला लागला. त्याचे वडिल सिलेंडर डिलेव्हरीचे काम करत होते. ५ बहिण आणि भावांमध्ये रिंकू तिसऱ्या क्रमांकाचा भाऊ आहे. घरची आर्थिक स्थिती हलाकीची असताना त्याच्या भावाने नोकरी सोडली होती. अशात रिंकूने नोकरी करण्याचे ठरवले. परंतु जास्त शिक्षीत नसल्यामुळे त्याला साफ-सफाईचे काम करावे लागले. मात्र पुढे त्याने क्रिकेटचा मार्ग निवडला आणि दिल्लीतील एका क्रिकेट स्पर्धेतील सामन्यादरम्यान शानदार प्रदर्शन करत त्याने सामनावीर पुरस्कारात बाईक जिंकली होती. मात्र त्या बाईकचा स्वतसाठी वापर न करता त्याने त्याच्या वडिलांना ती बाईक दिली होती.
फक्त १० लाखांपासून सुरू झाला आयपीएलचा प्रवास
रिंकूला सर्वप्रथम २०१७ मध्ये पंजाब किंग्जने खरेदी केले होते. त्यांनी १० लाख रुपयांची रक्कम खर्च करत त्याला लिलावात विकत घेतले होते. परंतु तो संपूर्ण हंगाम तो बाकावर बसून राहिला. त्यानंतर २०१८ मध्ये कोलकाताने त्याला विकत घेतले आणि त्या हंगामात ४ सामने खेळण्याची संधी दिली. पुढे २०१९ मध्ये ५ आणि २०२० मध्ये १ सामना खेळायला मिळाला. २०२१ मध्ये तर तो दुखापतीमुळे संपूर्ण हंगामाला मुकला.
मात्र २०२२ मध्ये पुन्हा एकदा कोलकाताने त्याच्यावर दाव लावला आणि ५५ लाखांच्या किंमतीला त्याला आपल्या संघात घेतले. आतापर्यंत या हंगामात त्याला ३ सामने खेळायला मिळाले आहेत, ज्यामध्ये त्याने शानदार खेळ दाखवला आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
अर्रर्र! खराब फॉर्ममुळे वेंकटेश अय्यरची हाकालपट्टी; प्लेइंग इलेव्हनमध्ये ‘या’ खेळाडूला मिळाले स्थान
एसपी गोसावी मेमोरियल पुणे आंतरक्लब टेनिस अजिंक्यपद: पीवायसी १ व पीवायसी २ यांच्यात विजेतेपदासाठी लढत