---Advertisement---

केकेआरच्या खेळाडूवर कोसळला संकटाचा डोंगर, आधी टीममेट कोरोना पॉझिटिव्ह; मग जवळच्या नातेवाईकाने निधन

On: मंगळवार, मे 4, 2021 9:36 AM
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीगसाठी सोमवारचा दिवस (३ मे) विसरण्याजोगा ठरला. त्यातही कोलकाता नाईट रायडर्स संघाचा यष्टीरक्षक फलंदाज शेल्डन जॅक्सन याच्यासाठी या दिवशी एकापाठोपाठ दोन वाईट बातम्या पुढे आल्या. सुरुवातीला त्याचे दोन संघसहकारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले. त्यानंतर त्याच्या जवळच्या नातेवाईकाचे निधन झाले. स्वत: जॅक्सनने ट्विटरद्वारे यासंदर्भात माहिती दिली आहे.

जॅक्सनने ट्विट करत लिहिले आहे की, ‘आज सायंकाळी मी माझ्या काकूला गमावले. जेव्हा मला आयपीएलच्या या हंगामात कोललाकाता संघात निवडले गेले होते, तेव्हा माझ्यापेक्षाही तिला जास्त आनंद झाला होता. याच कारणामुळे मी कोलकाताची अर्ध्यात साथ न सोडला पुढील सामनेही खेळणार आहे. मी त्या सर्वांचे आभार मानू इच्छितो, ज्यांनी या कठीण काळात माझी मदत केली. आपले सर्वोत्कृष्ट देत माझ्या काकूला वाचवण्याचा प्रयत्न केला, त्यांचे सर्वांचे अभिवादन. काकूंच्या आत्म्यास शांती लाभो एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो.’

याच दिवशी कोलकाता संघातील मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्ती आणि संदीप वॉरियर यांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आढळले आले होते. त्यामुळे अहमदाबाद येथे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होणारा सामना पुढे ढकलण्यात आला आहे.

भलेही जॅक्सनला यावर्षी पुन्हा कोलकाता संघात स्थान मिळाले आहे. परंतु अद्याप त्याला राजस्थानकडून एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. २० लाखांच्या मूळ किंमतीला विकत घेतलेला हा खेळाडू यापुर्वीही कोलकाता संघाचा भाग होता.

आयपीएल २०१७ मध्ये त्याने कोलकाताकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. या हंगामात एकूण ४ सामने खेळताना त्याने ३८ धावा केल्या होत्या. त्याची ही निराशाजनक कामगिरी पाहता कोलकाताने त्याला रिलीज केले होते. परंतु यावर्षी कोलकाताने पुन्हा त्याला आधारभूत किंमतीसह विकत घेतले आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

ब्रेकिंग! ‘थाला’च्या चेन्नईचा राजस्थानविरुद्ध आगामी सामना खेळण्यास नकार, बीसीसीआयला दिली माहिती?

आयपीएलमध्ये कोरोनाचा शिरकाव, दिल्ली हाय कोर्टात याचिका दाखल; आज होणाऱ्या सामन्यावर टांगती तलवार

खरा संघमालक! केकेआरच्या ताफ्यात कोरोनाची एंट्री, खुद्द किंग खानने खेळाडूंना ‘असा’ दिला धीर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---