आयपीएल 2023 मध्ये सोमवारी (8 मे) कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्स असा सामना खेळला गेला. अखेरच्य चेंडूपर्यंत थरारक झालेल्या सामन्यात केकेआरने विजय मिळवला. एक वेळ सामना हाताबाहेर गेला आहे असे वाटत असताना आंद्रे रसेल व रिंकू सिंग यांनी वादळी फलंदाजी करत संघाला विजय मिळवून दिला. संघाला विजय मिळाला असला तरी कर्णधार नितीश राणा याच्यावर मात्र कारवाई झाली आहे.
केकेआरसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या सामन्यात संघाला अखेरच्य चेंडूवर विजय मिळाला. विजयासाठी मिळालेले मोठे आव्हान केकेआरने कर्णधार राणा, अनुभवी रसेल व युवा रिंकू सिंग यांच्या खेळाच्या जोरावर पूर्ण केले. या विजयामुळे केकेआरचे स्पर्धेतील आव्हान कायम राहिले आहे. मात्र, नितिश राणा याच्यावर षटकांची गती संथ राखल्याने मॅच रेफ्रींनी कारवाई केली. या चुकीसाठी त्याच्याकडून 12 दंड आकारला गेला.
त्याचीही पहिलीच चूक असल्याने तसेच त्याने आपली चूक मान्य केल्याने पुढील कारवाई करण्यात आली नाही. राणा याला या हंगामात यापूर्वी देखील अशाच पद्धतीने दंड ठोठावला गेला होता. मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात ऋतिक शौकीन याच्याशी वाद घातल्याने सामना शुल्कातील 25 टक्के रक्कम त्याला भरावी लागली होती.
षटकांची गती संथ राखल्याने कारवाई झालेला राणा या हंगामातील पहिला कर्णधार नाही. याआधी केएल राहुल, फाफ डू प्लेसिस, शिखर धवन व संजू सॅमसन यांनी ही चूक केली होती.
या सामन्या बद्दल बोलायचे झाल्यास पंजाब ने प्रथम फलंदाजी करताना कर्णधार शिखर धवनच्या अर्धशतकामुळे 179 अशी मोठी मजल मारली होती. केकेआरसाठी वरूण चक्रवर्तीने तीन बळी मिळवलेले. या धावांचा पाठलाग करताना केकेआरसाठी जेसन रॉय, रिंकू सिंग, नितिश राणा व आंद्रे रसेल यांनी शानदार खेळ दाखवत संघाला विजय मिळवून दिला.
(KKR Skipper Nitish Rana Fined For Slow Over Rate After Match Against Punjab Kings)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
केकेआरच्या विजयाने गुणतालिकेत खळबळ! मुंबईसह ‘हे’ संघ डू ऑर डाय स्थितीत, वाचा सविस्तर
“ईडन गार्डन्सवर रिंकू-रिंकू ऐकून अंगावर काटा येतो”, राणा-रसेलची दिलखुलास कबुली