कोलकाता नाईट रायडर्स संघाला आयपीएल २०२२च्या ५३व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सच्या हातून ७५ धावांनी पराभूत व्हावे लागले. कोलकाताचा हा हंगामातील सातवा पराभव होता. या पराभवानंतर कर्णधार श्रेयस अय्यरने कोलकाताच्या पराभवामागील कारण सांगितले आहे.
काय म्हणाला अय्यर?
सामन्यानंतर श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) म्हणाला की, “लखनऊने आम्हाला फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्ही विभागात मात दिली. पॉवरप्लेमध्ये आमची सुरुवात खराब राहिली आणि अखेरच्या षटकातही आम्ही खूप धावा दिल्या. आम्हाला हेच समजले नाही की, या खेळपट्टीवर कशाप्रकारे खेळले जाईल. तसेच, त्याआधारे नाणेफेक जिंकल्यानंतर पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला. आम्ही त्यांना १५५-१६०पर्यंत रोखू शकलो असतो, परंतु शेवटी आम्हाला एक चांगले आव्हान मिळाले.”
“मी आणि प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलम (Brendon McCullum) आव्हानाचा पाठलाग करण्याबाबत चर्चा करतो. आमच्यात ही चर्चा वेळोवेळी होते. मी खूप सारे नाणेफेक जिंकले आहेत. मात्र, आम्ही जर नाणेफेक हारलो असतो, तर चांगलं झाले असते. आम्ही लहान-लहान गोष्टी हाताळण्यात यशस्वी ठरलो नाही. मधल्या षटकांमध्ये आम्ही चांगली गोलंदाजी करत आहोत. फक्त आम्हाला पॉवरप्ले आणि अखेरच्या षटकात चांगली कामगिरी करण्याची आवश्यकता आहे. आम्हाला याचे आकलन करून पुनरागमन करण्याची गरज आहे. पुढील ३ सामन्यांमध्ये आम्हाला हे करावेच लागेल,” असेही पुढे बोलताना श्रेयस म्हणाला.
या सामन्यात श्रेयसने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी फलंदाजीला आलेल्या लखनऊने क्विंटन डी कॉकच्या अर्धशतकाच्या आधारे २० षटकात ७ विकेट्स गमावत १७६ धावा कुटल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाताचा संघ रुळावरून खाली उतरला. कोलकाताला १४.३ षटकात सर्व विकेट्स गमावत फक्त १०१ धावाच करता आल्या. त्यामुळे लखनऊला ७५ धावांनी सामना खिशात घातला.
लकनऊने आयपीएलच्या चालू हंगामात सलग चौथा विजय मिळवला आहे. तसेच, २ महत्त्वपूर्ण गुण मिळवले आहेत. त्यामुळे ते चांगल्या रनरेटमुळे १६ गुणांसह गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर पोहोचले आहेत.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
सात सामन्यांनंतर पुनरागमन करताना जयस्वालची ‘यशस्वी’ खेळी, ‘या’ व्यक्तीला दिले श्रेय
एका षटकात ३० धावा देत मावीने केकेआरची डुबवली नौका, लाजिरवाणा विक्रमही केला नावे