असे अनेक युवा खेळाडू आहेत, जे आयपीएल 2023 स्पर्धेत जबरदस्त कामगिरी करत आहेत. या युवा खेळाडूंची कामगिरी पाहून नेटकरी मागणी करत आहेत की, त्यांना भारतीय संघात घेतले पाहिजे. या मागणीमध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाचा विस्फोटक फलंदाज रिंकू सिंग याच्या नावाचाही समावेश आहे. केकेआर संघाचा स्पर्धेतील प्रवास शनिवारी (दि. 20 मे) संपुष्टात आला. मात्र, रिंकूने यादरम्यान यशाचे शिखर गाठले. त्याने ईडन गार्डन्सवर खेळताना पुन्हा एकदा आपली प्रतिभा सिद्ध केली. लखनऊ सुपर जायंट्स संघाने 1 धावेने विजय मिळवूनही सर्वाधिक चर्चा रिंकूचीच रंगली.
रिंकूने शेवटपर्यंत लढवली खिंड
केकेआर (KKR) संघाच्या फलंदाजांनी एकापोठापाठ एक विकेट गमावण्याचे सत्र सुरूच ठेवले, पण रिंकू सिंग (Rinku Singh) याने शेवटपर्यंत संघाची खिंड लढवली. त्याने यादरम्यान 33 चेंडूंचा सामना करताना 4 षटकार आणि 6 चौकारांची बरसात केली. यावेळी त्याने 203.03च्या स्ट्राईक रेटने 67 धावा कुटल्या. यादरम्यान त्याने एक असा काही षटकार मारला, ज्याची सर्वत्र वाहवा होत आहे. हा षटकार केकेआरच्या डावातील 19व्या षटकात नवीन उल हक (Naveen ul Haq) याच्या गोलंदाजीवर आला. हा षटकार तब्बल 110 मीटर लांब होता. याच जोरावर त्याने अर्धशतक साकारले.
रिंकू सिंग 110 मीटर षटकार
रिंकूने मारलेला षटकार 19व्या षटकातील पाचव्या चेंडूवर पाहायला मिळाला. पहिल्या तीन चेंडूवर त्याने सलग तीन चौकार मारले होते. त्यानंतर चौथ्या चेंडूवर दोन धावा घेत स्ट्राईक पुन्हा आपल्याकडे ठेवली. यावेळी नवीनने गोलंदाजीची बदलली आणि चेंडू स्टंप्सच्या दिशेने फेकण्यास सुरुवात केली. यावेळी त्याने जसा पाचवा चेंडू टाकला, तसा रिंकून गुडघे वाकवत आणि टप्पा पडताच चेंडू डीप स्क्वेअरच्या दिशेने मारला. हा 110 मीटर लांबीचा षटकार (Rinku Singh 110 Meter Six) होता. यावेळी नवीननेही तोंड वाकडे केले. त्याची रिऍक्शन पाहण्यासारखी होती. यासोबतच रिंकूने 27 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. आयपीएल 2023मधील हा रिंकूचा सहावा सर्वात लांब षटकार ठरला. फाफ डू प्लेसिस याचा 115 मीटर लांबीचा षटकार हंगामातील सर्वात लांब षटकार आहे.
Rinku Singh hain inka naam🙌, namumkin nahin inke liye koi kaam 🤩 #KKRvLSG #IPLonJioCinema #TATAIPL #EveryGameMatters | @KKRiders pic.twitter.com/2YbgkciPW5
— JioCinema (@JioCinema) May 20, 2023
रिंकूने 19व्या षटकात ठोकल्या 20 धावा
मागील षटकात फक्त 5 धावा देऊन परतणाऱ्या नवीनला 19वे षटक खूपच महागडे ठरले. त्याने 19व्या षटकात 20 धावा खर्च केल्या. या धावा त्याला एकट्या रिंकूने मारल्या. नवीनने संपूर्ण सामन्यात 4 षटके गोलंदाजी करताना एकही विकेट न घेता 46 धावा खर्च केल्या. (kkr vs lsg cricketer rinku singh smashed 110 metre six in naveen ul haq over see video here)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘तुम्ही त्याला हलक्यात…’, 33 चेंडूत 67 धावा चोपणाऱ्या रिंकूबाबत LSGचा कर्णधार कृणालचे लक्षवेधी भाष्य
वॉर्नरच्या संघासाठी निराशाजनक ठरली आयपीएल 2023, पण कर्णधाराने विराटला पछाडत नावावर केला मोठा विक्रम