---Advertisement---

IPL 2022 | कर्णधार रोहित शर्माच्या चेहऱ्याचा उडाला रंग, सलग तिसऱ्या पराभवानंतरची रिएक्शन व्हायरल

On: गुरूवार, एप्रिल 7, 2022 1:08 PM
Rohit-Sharma
---Advertisement---

आयपीएल फ्रेंचायझी मुंबई इंडियन्सला कोलकाता नाइट रायडर्सकडून चालू हंगामातील सलग तिसरा पराभव मिळाला आहे. पॅट कमिन्सच्या धमाकेदार अर्धशतकानंतर केकेआरने सामन्यात ५ विकेट्स आणि ४ षटके शिल्लक ठेवून विजय मिळवला. मुंबई इंडियन्साच कर्णधार रोहित शर्मा मैदानात नेहमी हसऱ्या चेहऱ्यासह दिसत आला आहे, पण या पराभवानंतर तो देखील नाराज असल्याचे दिसले. सामना संपल्यानंतरचा रोहितचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

केकेआरविरुद्ध हंगामातील सलग तिसरा पराभव पत्करणाऱ्या मुंबई इंंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) सामना संपल्यानंतर स्वतःचा राग आवरण्याच्या प्रयत्नात दिसला. पराभवानंतर तो खरोखर खूप निराश असल्याचे पाहायला मिळाले. अशात नेहमी हसमुख असणाऱ्या रोहित शर्माचे एक नवीन रूप चाहत्यांना पाहायला मिळाले. यावरून स्पष्ट समजते की, कर्णधार संघाच्या प्रदर्शनाविषयी आजिबात समाधानी नाही.

रोहितचा हा नवीन चेहरा पाहिल्यानंतर चाहत्यांकडून सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. त्याच्या चेहऱ्याचा रंग उडल्यासारखा वाटत आहे. मुंबई इंडियन्सला त्यांंच्या पहिल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सकडून ४ विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला. दुसऱ्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने त्यांना २३ धावांनी मात दिली. अता मुंबईला त्यांचा पुढचा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध ९ एप्रिल रोजी खेळायचा आहे.

सामन्याचा विचार केला, तर केकेआरचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकली आणि मुंबईला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. प्रथम फलंदाजी करताना मुंबईने ४ विकेट्सच्या नुकसानावर १६१ धावा केल्या. यामध्ये सलामीवीर रोहित अवघ्या ३ धावा करून तंबूत परतला. प्रत्युत्तरात केकेआरने हे लक्ष्य १६ व्या षटकात गाठले. ऑस्ट्रेलियाचा कसोटी कर्णधार पॅट कमिन्सने केकेआरचे प्रतिनिधित्व करताना विक्रमी अर्धशतक साकारले.

कमिन्सने या सामन्यात १५ चेंडू खेळले आणि यामध्ये ५६ धावा ठोकल्या. अर्धशतक पूर्ण करण्यासाठी त्याला १४ चेंडू खेळावे लागले, जे आयपीएलच्या इतिहासातील सर्वात वेगवान अर्धशतक ठरले. आयपीएलमध्ये यापूर्वी केएल राहुलने देखील १४ चेंडूत वैयक्तिक अर्धशतक पूर्ण केले होते. मुंबईच्या डॅनियल सॅम्सने एका षटकात तब्बल ३५ धावा खर्च केल्या. केकेआरसाठी कमिन्सव्यतिरिक्त त्यांचा सलामीवीर फलंदाज वेंकटेश अय्यरने देखील अर्धशतक ठोकले.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या –

IPL 2022| केव्हा आणि कसा पाहाल लखनऊ वि. दिल्ली सामना, कसे असेल हवामान; जाणून घ्या सर्वकाही

व्वा गुरुजी! तीन असे प्रशिक्षक, ज्यांनी संघाला कमीत कमी दोनदा जिंकून दिलीय आयपीएल ट्रॉफी

डिविलियर्सला आदर्श मानणाऱ्या ‘बेबी एबी’चे मुंबई इंडियन्सकडून आयपीएल पदार्पण; पहिल्याच सामन्यात केला कहर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---