आयपीएल 2023 हंगामातील 9वा सामना गुरुवारी (6 एप्रिल) कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात खेळला जाणार आहे. उभय संघांतील ही लढत कोलकाता स्थित ईडन गार्डन स्टेडियमवर होईल. सायंकाळी 7.30 वाजता हा थरार पाहण्यासाठी स्टेडियममध्ये चाहेत सज्ज असतील. चला तर जाणून घेऊ खेळपट्टी आणि संभावित प्लेइंग इलेव्हनविषयी.
आयपीएल 2023 (IPL 2023) हंगामाची सुरुवात 31 मार्च रोजी झाली आहे. कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर दोन्ही संघांनी या हंगामात आतापर्यंत एक-एक सामना खेळला आहे. आरसीबीला आपल्या पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सविरुद्ध विजय मिळाला होता. तर दुसरीकडे केकेआरला हंगामातील पहिल्याच सामन्यात पंजाब किंग्जकडून पराभव स्वीकारावा लागला. गुरुवारी दोन्ही संघ आमने सामने आल्यानंतर लढत चांगलीच रोमांचक होण्याची शक्यता आहे.
केकेआर विरुद्ध आरसीबी आमने-सामने आकडेवारी
केकेआर आणि आरसीबी यांच्या आमने सामने आकडेवारीचा विचार केला, तर पारडे केकेआरच्या बाजूला झुकलेले दिसते. दोन्ही संघ आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत एकूण 30 वेळा आमने सामने आले आहेत. यातील 16 सामन्यांमध्ये केकेआर, तर राहिलेल्या 14 सामन्यांमध्ये आरसीबीने विजय मिळवला. असे असले तरी, हे अंतर जास्त नाही. आरसीबीला केकेआरची बरोबरी करण्यासाठी अजून दोन विजय हवे असतील.
खेळपट्टीविषयी
कोलकाता स्थित ईडन गार्डन क्रिकेट स्टेडियम अनेक ऐतिहासिक सामन्यांचे साक्षीदार आहे. याठिकाणी आतापर्यंत खेळलेल्या सामन्यांमध्ये खेळपट्टी गोलंदाजीच्या तुलनेत फलंदाजीसाठी अधिक अनुकूल असल्याचे पाहिले गेले आहे. तसेच फिरकी गोलंदाजांना देखील याठिकाणी वेगवान गोलंदाजांच्या तुलनेत अधिक फायदा मिळाला आहे. याठिकाणी लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघासाठी विजय सोपा असतो. याठिकाणी झालेल्या 12 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांपैकी 7 सामन्यांमध्ये लक्ष्याचा पाठलाग करणारा संघ जिंकला आहे.
दोन्ही संघांची संभावित प्लेइंग इलेव्हन –
आरसीबी – फॉफ डुप्लेसी(कर्णधार), विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, मायकल ब्रेसवेल, दिनेश कार्तिक(यष्टीरक्षक), शाहबाज नदीम, हर्षल पटेल, आकाशदीप, डेविड विली, कर्ण शर्मा, मोहम्मद सिराज.
केकेआर – रहमानुल्लाह गुरबाज, वेंकटेश अय्यर, अनुकूल रॉय, नितीश राणा(कर्णधार), रिंकू सिंह, आंद्रे रसेल, सुनील नरेन, शार्दुल ठाकुर, टिम साउदी, उमेश यादव, वरुण चक्रवर्ती.
(KKR vs RCB Probable Playing XI and Head to Head Stats)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
धोनी-युवराजसह टीम इंडियाच्या पाच खेळाडूंवर नवीन जबाबदारी, एमसीसीकडून मोठी घोषणा
ब्रेकिंग : भारताकडून वनडे क्रिकेटमध्ये पहिला चौकार लगावणारा सलामीवीर काळाच्या पडद्याआड, 2011 विश्वचषकासोबत खास नाते