---Advertisement---

आज भिडणार हैदराबाद- कोलकाता संघ; अशी असू शकते दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

On: शनिवार, सप्टेंबर 26, 2020 6:18 PM
---Advertisement---

आयपीएलच्या 13 व्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद संघाची सुरुवात चांगली झाली नव्हती. दोन्ही संघांना आपल्या पहिल्या सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले होते. आज (26 सप्टेंबर) या दोन्ही संघादरम्यान सामना होणार आहे. दोन्ही संघांचा हा या हंगामातील दुसराच सामना आहे.

हैदराबादचा अष्टपैलू मिशेल मार्श दुखापतीमुळे या स्पर्धेतून बाहेर पडला आहे, त्यामुळे संघात काही बदल होऊ शकतात. हैदराबादसाठी पुन्हा एकदा कर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टोची जोडी डावाची सुरुवात करतांना दिसणार आहे. त्याच वेळी, केन विलियम्सन मधल्या फळीत फलंदाजीसाठी येऊ शकेल. त्यांच्याशिवाय मनीष पांडे, प्रियम गर्ग, अभिषेक शर्मा, वृद्धिमान साहा यांना संधी मिळू शकेल. गोलंदाजीत राशिद खान, भुवनेश्वर कुमार, टी नटराजन आणि संदीप शर्मा यांना संधी मिळू शकेल.

केकेआर संघात पुन्हा एकदा शुबमन गिल आणि सुनिल नरेन डावाची सुरुवात करतांना दिसू शकतात. त्याचबरोबर दिनेश कार्तिक, ऑएन मॉर्गन, नितीश राणा, आंद्रे रसेल आणि राहुल त्रिपाठी मधल्या फळीत दिसू शकतात. गोलंदाजीत पॅट कमिन्स, शिवम मावी, संदीप वॉरियर आणि कुलदीप यादव यांचा समावेश आहे.

सनरायझर्स हैदराबाद संघाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन:

डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), केन विलियम्सन, मनीष पांडे, प्रियम गर्ग, जॉनी बेअरस्टो, अभिषेक शर्मा, विजय शंकर, भुवनेश्वर कुमार, टी नटराजन, संदीप शर्मा, राशीद खान

कोलकाता नाइट रायडर्स संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन:

शुबमन गिल, ऑएन मॉर्गन, नितीश राणा, राहुल त्रिपाठी, दिनेश कार्तिक (कर्णधार), आंद्रे रसेल, सुनील नरेन, पॅट कमिन्स, शिवम मावी, संदीप वॉरियर आणि कुलदीप यादव.

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---