गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएल 2025च्या सामन्यात गेल्या हंगामातील उपविजेत्या सनरायझर्स हैदराबादला 80 धावांनी पराभूत करून हंगामातील आपला दुसरा विजय नोंदवला. या सामन्यात, नाणेफेक गमावल्यानंतर, केकेआर संघाने प्रथम फलंदाजी करत 20 षटकांत 6 गडी गमावून 200 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना हैदाराबाद संघाने सर्व बाद 120 धावा केल्या. चमकदार गोलंदाजीच्या जोरावर केकेआरने हा सामना एकतर्फी जिंकला.
या सामन्यात केकेआरच्या गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केली. संघाने हैदराबादला पाॅवरप्लेमध्येच बॅकफूटला ढकलले. केकेआरच्या गोलदाजांनी हैदराबादच्या 3 फलंदाजांना पहिल्या सहा षटकातच माघारी पाठवले. त्यामुळे हैदराबद संघ पुन्हा सामन्यात कमबॅक करु शकला नाही. वैभव अरोराने शानदार कामगिरी केली. त्याने 4 षटकात 3 विकेट्स घेतल्या. त्याने ट्रॅव्हिस हेड (04), ईशान किशन (02) आणि हेनरिक क्लासेनला (33) बाद केले. शिवाय वरुण चक्रवर्तीने 3 विकेट्स घेत त्याला चांगली साथ दिली. पाॅवरप्लेमधील मधील खराब कामगिरीचा हैदराबादला मोठा फटका बसला. त्यामुळे संघास पराभवाला सामोरे जावे लागले.
1st ball ➡ FOUR! ????????
— Star Sports (@StarSportsIndia) April 3, 2025
2nd ball ➡ CAUGHT! ????????#KKR gets the perfect start as #VaibhavArora strikes early to dismiss the dangerous #TravisHead! ????????
Watch LIVE action ➡ https://t.co/2YmeiCdBz9#IPLonJioStar ???????? #KKRvSRH | LIVE NOW on Star Sports 1, Star Sports 1 Hindi &… pic.twitter.com/xwhaGDVmuv
Rapid Rahane, Rampant #KKR ???? ????
— IndianPremierLeague (@IPL) April 3, 2025
A superb catch to highlight a dream start for KKR in the field ????
Updates ▶ https://t.co/jahSPzdeys#TATAIPL | #KKRvSRH | @KKRiders | @ajinkyarahane88 pic.twitter.com/gWhXWfLxff
Game. Set. Match. #KKR? ????#VaibhavArora returns to the attack and strikes GOLD! #HeinrichKlaasen departs, bringing the home team closer to victory! ????#IPLonJioStar ???????? #KKRvSRH | LIVE NOW on Star Sports 1, Star Sports 1 Hindi & JioHotstar! pic.twitter.com/LNyjZx0pNw
— Star Sports (@StarSportsIndia) April 3, 2025
तत्तपूर्वी, सामन्यात एक वेळ अशी होती की, जेव्हा केकेआर देखील अडचणीत होता. एकामागून एक दोन विकेट पडल्या आणि त्यानंतर लगेचच जेव्हा तिसरी विकेटही पडली तेव्हा व्यंकटेशने जबाबदारी घेतली आणि संघाला 200 धावांचा टप्पा ओलांडून नेले.
पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या व्यंकटेश अय्यरने फक्त 29 चेंडूत 60 धावा केल्या. ज्यात त्याने 7 चाैकार आणि 3 षटकार मारले. एकेकाळी संघ 200 धावांपर्यंत पोहोचेल असे वाटत नव्हते, पण अय्यरने एक शानदार खेळी खेळली आणि आपल्या संघाला त्या टप्प्यावर पोहोचवले.






