आयपीएलमध्ये रविवारी (11 एप्रिल) रोजी खेळलेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करीता उतरलेल्या कोलकाता नाईट रायडर्सने नितीश राणा आणि राहुल त्रिपाठीच्या अर्धशतकाच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादविरुद्ध सहा गड्यांच्या मोबदल्यात 187 धावांचा डोंगर ऊभा केला. यामध्ये नितीश राणाने 56 चेंडूत 80 तर राहुल त्रिपाठीने 29 चेंडूत 53 धावा कुटल्या. तर सनरायजर्स हैदराबादकडून गोलंदाजी करताना मोहम्मद नबी आणि राशिद खान यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.
पण या सामन्याच्या शेवटच्या क्षणी दिनेश कार्तिकने 9 चेंडूत 22 धावा करून संघाची धावसंख्या 187 धावांवर नेण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्याने त्याच्या या छोट्या खेळीत 2 चौकार आणि एक षटकार खेचला. विशेष म्हणजे त्याने भुवनेश्वर कुमारच्या चेंडूवर, बसून मारलेला षटकार खास आकर्षण ठरला.
कार्तिकने मारलेला हा षटकार एवढा पाहण्यासारखा होता की कॉमेंट्री करनारेही त्याची वाहवा करताना दिसून आले. केकेआरच्या डावातील 20 व्या षटकात भुवनेश्वर कुमारच्या पहिल्या चेंडूवर त्याने हा गगनचुंबी षटकार लावला. त्याचा हा षटकार पाहून भुवीलाही आश्चर्य वाटले.
Dinesh Karthik's sweep shot🔥 pic.twitter.com/gO2eMnZSNd
— 𝗦𝗢𝗛𝗔𝗜𝗟⚔ (@iamsohail_1) April 11, 2021
आयपीएल 2021 च्या या तिसर्या सामन्यात हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणचा निर्णय घेतला. केकेआरकडून शुभमन गिल आणि राणा यांनी सलामी फलंदाजी करताना पहिल्या विकेटसाठी 53 धांवांची भागीदारी केली. त्यानंतर फलंदाजी साठी आलेल्या राहुल त्रिपाठीने नितीश राणासमवेत केकेआरचा डाव सांभाळला. राहुलने आपल्या आयपीएल कारकीर्दीतील 1000 धावांचा टप्पा पूर्ण केला. असे करणारा तो 41 वा फलंदाज ठरला.
महत्त्वाच्या बातम्या-
‘इंदिरानगर का गुंडा’ नंतर द्रविडची दुसरी जाहिरात व्हायरल, पाहा व्हिडिओ
कर्णधार म्हणून मैदानात उतरताच संजू सॅमसनचा मोठा पराक्रम, खास क्लबमध्ये झाला सामील